सिन्नर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

बळीराजा सुखावला; दुबार पेरणीचे संकट टळले
सिन्नर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

बऱ्याच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावल्याने सिन्नर तालुक्यातील (Sinnar taluka) दुबार पेरणीचे संकट टळले. तसेच अनेक ठिकाणी बाकी असलेल्या पेरणीचा (crops sowing) मार्गदेखील मोकळा झाला आहे...

यंदा सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी दिसून आला. शेतकऱ्यांनी (Farmers) पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केल्यानंतरही जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या किरकोळ पावसावर काही शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या पूर्ण केल्या.

चांगला पाऊस नसल्याने अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी असल्याने शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करत होता. कमी पावसावर पेरलेली कोवळी पिकेदेखील उन्हाच्या तडाख्यामुळे सुकू लागली होती. सुकलेली पीके बघून दुबार पेरणी करावी लागते की काय अशा संकटात शेतकरी सापडला होता.

रविवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अडीच ते तीन तास सुरू असलेल्या पावसाने शेतातील बांध नाले तुडुंब भरून वाहू लागले. या पावसाने बळीराजा सुखावला असून दुबार पेरणीचे संकट टाळले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com