दीपोत्सवावर अतीवृष्टीचे सावट

दीपोत्सवावर अतीवृष्टीचे सावट

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

तेजोमय प्रकाश व चैतन्य-मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपोत्सवास (Deepotsava) कामधेनूचे रूप मानले जाणार्‍या गाई-वासराचे पुजन महिलांतर्फे केले जावून मोठ्या उत्साहात प्रारंभ केला गेला.

दिवाळी सणाच्या (diwali festival) पार्श्वभूमीवर सज्ज झालेल्या बाजारपेठांमध्ये दोन दिवसापासून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होवू लागल्याने व्यापारी उत्साहीत झाल्याचे दिसून आले.

करोना (corona) उद्रेकाने दोन वर्षे अडचणीत गेली. यंदा अतीवृष्टीचे (heavy rain) दिवाळीवर पसरले असल्याने यंदाचे वर्ष देखील आमच्यासाठी कठीण जाणार आहे. निर्बंधमुक्त वातावरणामुळे यंदा चांगली खरेदी होईल या आशेवर मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवला होता. मात्र अतीवृष्टीच्या (heavy rain) पावसाने आमच्या आशेवर पाणी फेरले आहे. गोबारसपासून काहीशी गर्दी बाजारात झाली आहे. मात्र यंदा देखील हात आखडता ठेवत ग्राहकांतर्फे खरेदी केली जात आहे. खरेदीवर मोठा परिणाम झाला असल्याची खंत अनेक व्यावसायिकांनी बोलून दाखवली.

शुक्रवारी वसुबारस (Vasubaras) सणाव्दारे शहर-तालुक्यात दीपोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. शहरात सायंकाळनंतर घरोघरी प्रज्वलीत होत असलेल्या मातींच्या पणत्यांसह लक्ष वेधून घेणारे आकाशकंदिल व दीपमाळांच्या विद्युत रोषणाईने (Electric lighting) शहर-परिसर उजळून निघाला होता. विविध रंगातील घराच्या अंगणात साकारलेल्या रांगोळ्या लक्ष वेधून घेणार्‍या होत्या. दीपावलीचा प्रकाश पर्व सुरू झाल्याचा उत्साह शहरात दिसून येत असतांना ग्रामीण भागात (rural area) मात्र अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीचे सावट दीपोत्सवात प्रकर्षाने दिसून येत आहेर्.

अतीवृष्टीने यंदा खरीप हंगामातील (kharif season) सर्वच पिकांची वाताहत केली आहे. फळबागा देखील पावसाच्या तडाख्याने उध्वस्त झाल्या आहेत. काही पिके वाचली मात्र परतीच्या पावसाने तडाखा देत ती देखील केली. उत्पादनासाठी केलेला खर्चच निघणार नाही अशी परिस्थिती संपुर्ण तालुक्यातील शेतकर्‍यांची (farmers) झाली आहे. अतीवृष्टीने संपुर्ण आर्थिक गणित कोलमडून गेले असल्याने शेतकर्‍यांची दिवाळी (diwali) यंदा निराशा व अंधारातच असल्याची खंत दहिदी येथील प्रगतशील शेतकरी रमेश कचवे यांनी दै.‘देशदूत’शी (deshdoot) बोलतांना व्यक्त केली.

अतीवृष्टीने पिकांची झालेली हानी तसेच आर्थिक मंदी व ऑनलाईन खरेदीचा (Online shopping) बाजारपेठांवर प्रकर्षाने पडला असल्याने किराणा मालासह कपडे व इतर साहित्यांची खरेदी अत्यल्प स्वरूपात होत आहे. लहान मुलांचा अपवाद वगळता कपड्याची फारशी खरेदी केली जात नाही. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर वस्तू व कपड्यांचा साठा आर्थिक तोटा वाढविणारा ठरणार आहे.

वसुबारसने बाजारात गर्दी होवू लागली आहे. किराणा, धान्य आदी साहित्य खरेदीसाठी गुळबाजार, चौक, धान्य बाजार, सोयगाव मार्केट, कॅम्प मार्केट आदी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची रेलचेल दिसून येत असली तरी खरेदी हात आखडून केली जात आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात काय प्रतिसाद मिळतो या चिंतेत किराणा व कापड व्यावसायिक पडले आहेत. गत तीन वर्षात प्रथमच बाजारपेठेत असे निरूत्साही वातावरण दिसून येत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com