जोरदार पावसाने नद्यांना पूर; शाळांसह रेल्वेस्थानक प्रभावित

जोरदार पावसाने नद्यांना पूर; शाळांसह रेल्वेस्थानक प्रभावित

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

शहर परिसरासह ग्रामीण भागात (rural area) सलग दुसर्‍या दिवशी मान्सूनच्या (monsoon) पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल अडीच तास मुसळधारेने शहराला अक्षरशः झोडपून काढल्यामुळे शहरातून वाहणार्‍या रामगुळणा व पांझण नदीला पूर आले.

पावसाचे पाणी सखल भागांसह मुख्य रस्त्यांवर साचून ठिकठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. एका शाळेत पाणी शिरल्यामुळे शिक्षक (teachers) व विद्यार्थ्यांची (students) तारांबळ उडाली. जोरदार पावसाचा फटका रेल्वेस्थानकालाही (Railway station) बसला असून काही प्लॅटफार्मवरील छताला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असले तरी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे खोळंबलेल्या पेरणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांना देखील जीवदान मिळाल्यामुळे शेतकर्‍यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मान्सूनपूर्व पावसाने शहर परिसरात धुमाकूळ घातला होता. चक्रीवादळामुळे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली होती. संपर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे तापमानात (temperature) मोठी वाढ झाली होती.

एकीकडे तापमानात झालेली वाढ, त्यात पावसाने फिरवलेली पाठ यामुळे सर्वसामान्य नागरिकासह बळीराजा देखील चिंतेत सापडला होता. अखेर मान्सूनच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. सलग दोन दिवस जबरदस्त पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणार्‍या रामगुळणा व पांझण या दोन्ही नद्यांना पूर आले तर सखल भागात पाणी साचून त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. सर्व रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली.

पावसाचे पाणी शालेय वर्गात शिरल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली होती. पालकांना याची माहिती मिळताच त्यांनी शाळेत धाव घेऊन मुलांना सुरक्षित घरी नेले. जोरदार पावसाचा फटका रेल्वेस्थानकाला देखील बसला असून काही प्लॅटफार्मवरील छताला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असले तरी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी शहरातील अनेक भागात कॉन्क्रीट रस्ते तयार करण्यात आले. मात्र त्यापैकी काही रस्ते पहिल्याच पावसात खराब झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामासोबत अभियंत्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com