कसमादेत पावसाचा जोर कायम

कसमादेत पावसाचा जोर कायम

मुंजवाड । वार्ताहर | Munjwad

कळवण (kalwan), देवळा (devla), सटाणा (satana), मालेगाव (malegaon) तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून संततधार (heavy rain) सुरू असल्याने हरणबारी (haranbari) व केळझर (kelzar) तुडूंब भरण्यासह चणकापूर (chankapur) व पुनद धरणातील (punad dam) पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.

परिसरातील गिरणा (Girna), मोसम (Mosam), आरम नद्या दुथडी ओसंडून वाहत आहेत. बागलाणच्या (baglan) पश्चिम पट्ट्यात धबधबे खळाळले असून डोंगरांवर पसरलेली हिरवाई पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

पावसाळ्यात (monsoon) साधारणत: सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पावसाच्या पाण्याने धरणे भरतात. चालुवर्षी मात्र जुलैच्या दुसर्‍याच आठवड्यात संततधार पाऊस झाल्याने बागलाण तालुक्यातील (baglan taluka) हरणबारी धरणापाठोपाठ 572 द.ल.घ.फूट क्षमता असलेले केळझर (गोपाळसागर) धरणही पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहू लागल्याने आरम नदी खळाळली आहे. त्यामुळे केळझर, तताणी, भावनगर, करंजखेड, साकोडे, डांगसौदाणे, बुंधाटे, निकवेल, कंधाणे, चौंधाणे, मुंजवाड व सटाणा शहराला पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे.

कळवण तालुक्यातील चणकापूर व पुनद धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गिरणा नदी (girna river) दुथडी वाहत आहे. त्यामुळे कळवण, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न (drinking water issue) सुटणार आहे. नदीकाठवरील गावांचा शेती सिंचनाचाही प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असल्याने शेतकरी (farmers) व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील साल्हेर-मुल्हेर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हरणबारी धरण (Haranbari Dam) पुर्ण क्षमतेने भरले असून मोसम नदी (mosam river) दुथडी वाहु लागली आहे. साल्हेरपासून मालेगावपर्यंत मोसम नदीचा प्रवाह असून नदीकाठावर सुमारे 100 पेक्षा जास्त गावे वसली आहेत. बागलाणसह मालेगाव तालुक्यातील मोसमखोर्‍याचा शेती सिंचनाचा प्रश्न याच नदीवर अवलंबून आहे. हरणबारी धरण भरल्यानंतर मोसम नदीतून रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडले जाते.

या नदीच्या पूरपाण्यातून हरणबारी डावा व उजवा कालव्याद्वारे लहान-मोठे तलाव भरले जातात. नदीवर बांधण्यात आलेले बंधारे भरल्याने नदीकाठावरील जमिनीत पाण्याची पातळी वाढते. त्याचबरोबर विहिरींचे पाझरही जीवंत होतात. यंदाच्या पावसाळ्यात नदीला लवकर पूर आला असून, नदीकाठावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र, कुठेही जीवितहानी झाली नसून नदीकाठच्या गावांना बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने भात व नागलीच्या लागवडीला वेग आला आहे. भर पावसात आदिवासी शेतकरी भात, नागली लागवडीची कामे करताना दिसून येत आहेत. या परिसरातील धबधबे देखील खळखळून वाहत असून डोंगरावर हिरवळ पसरल्याने निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पाऊले या परिसराकडे वळू लागली आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com