दिंडोरी : मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला
दिंडोरी : मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला
नाशिक

दिंडोरी : मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला

धरणसाठ्यात दोन टक्के वाढ

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

दिंडोरी । Dindori प्रतिनिधी

दिंडोरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला असला तरी अजून पूर पाणी न गेल्याने चिंता व्यक्त होत आहे.

दिंडोरी शहरात व तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत असलेला शेतकरी सुखावला आहे. यंदा पावसाने श्रावण महिन्यातही दांडी मारली. मागील वर्षी जुलै अखेरपर्यंत धरणे ओसांडून वाहत होते.

परंतु यंदा जुलै संपला तरीही साधा पूरही नदीला आला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त होत होती. कालच्या पावसाने मात्र शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी पावसाची चातकप्रमाणे वाट पाहत होते.

पण काल ती अपेक्षा पूर्ण झाली. पश्चिम भागात असलेल्या नाल्यांना पूर आल्याने सध्याकाळपर्यंत धरण पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. अद्याप जरी पाऊस वाढला नसला तरी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर पाऊस पडून धरण पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com