Video : येवला तालुक्यात पावसाचा कहर; शेतकरी हवालदिल

Video : येवला तालुक्यात पावसाचा कहर; शेतकरी हवालदिल

येवला | प्रतिनिधी Yeola

तालुक्यातील कातरणी Katarni , रहाडी Rahadi येथे नेउरगाव Neurgaon येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने Heavy Rain कांदा, टोमॅटो, मिरची, सोयाबीन आदी पिकांना फटका बसला आहे तर उरल्यासुरल्या पिकांचीही धुळधाण झाली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

गेल्या पंधरवड्यात पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतात न होतात तोच काल व आज झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने कातरणी, रहाडी, नेउरगाव या परिसरात हाहाकार माजवला. याअगोदर झालेल्या पावसाने पिके सडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र काल झालेल्या पावसाने उभ्या पिकांसह अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीही वाहून गेल्या आहेत. आज दुपारी तास दोन तास कोसळलेल्या पावसाने उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. काल येवला तालुक्याच्या पूर्व भागात रहाडी परिसरात तर उत्तर भागात कातरणीत ढगफुटी सदृश्य पावसाने उच्छाद मांडल्यागत परिस्थिती निर्माण झाली होती.

तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या राहाडी, वडजी तर उत्तरेला असलेल्या कातरणी परिसरात मेघगर्जनेसह आलेल्या धुवांधार पावसाने. कांदा, सोयाबीन, मका कापूस भुईमूग यासह इतर पिकांची धूळधाण झाली आहे. या अगोदर झालेल्या पावसाने कांदा, कापूस ही पिके पाण्यात लोळण घेत होती. तर काल झालेल्या पावसाने पिकेच वाहून गेली आहेत. मक्याचे उभे पीक कालच्या पावसाने आडवे झाले असून उरलासुरला कडबाही सडणार असल्याने गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे. परिसरातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला. पाऊस थांबण्याची नाव घेत नसल्याने शेतकरी आता धास्तावले आहेत. रहाडी, वडजी परिसरात झालेल्या पावसामुळे औरंगाबाद व वैजापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती.

आमच्याकडे झालेल्या पावसाने भयानक नुकसान झाले असून अक्षरशः जमिनी वाहून गेल्या आहेत. पंचनाम्याना त्वरीत सुरवात करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

योगेश पाटील, उपसरपंच कातरणी

एक आठवड्यापूर्वीच परिसरात मुसळधार पाऊसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्या नुकसानीतून सावरत नाही, तोच पुन्हा एकदा या परिसरात पावसाने हजेरी लावल्याने लागवड केलेली मिर्ची, टमाटे, कांदा पिकांत मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

विनोद कदम, शेतकरी, नेउरगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com