तीन तालुक्यांत मुसळधार; शहरासह १२ तालुके कोरडेच

तीन तालुक्यांत मुसळधार; शहरासह १२ तालुके कोरडेच

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक (Nashik) जिल्हा गेल्या दिड महीन्यापासुन वरुण राजाची चातका सारखी वाट पाहत होता. अखेर श्री. पांडुरंगाच्या कृपेने आषाढी एकादशीच्या (Aashadi Ekadashi) मुहुर्ताावर पावसाने जोरदार हजेरी लावत जिल्हा वासीयांची तहान भागवीण्यास प्रारंभ केला आहे. कालपासुन निम्म्या जिल्ह्यात पावसाने चांंगला जोर धरला आहेे... (Heavy Rain in three talukas in nashik district)

गेल्या दिड महीन्यापासुन पाऊस थोडी हजेरी लावत असला तरी ग्रामीण भागात पेरण्या रखडल्या होत्या. नाशिकमध्ये (Nashik) रविवाारपासुन पावसाने हजेरी लावली. थोड्या पावसाने जलमय झालेेले रस्ते पाहुन नागरिकांना समाधान वाटले तरी शेतीसाठी अपेक्षीात पाऊस अद्याप नव्हता.

मात्र, आज पहाटे दोन तास. चांगला पाऊस झाला. दिवसभर ढगाळ हवामान होते. त्र्यंबकेश्वरला ७१ मिलीमीटर पाऊस झाला.

इगतपुरीत २२२ मिमि. (Igatpuri Rain) पावसाची नोंंद झाली. पेठ (Peth) तालुक्यातही १४३ मिलीमटर पाऊस झाला. सुरगाण्यात ११७ (Surgana), नाशिकला १२ (Nashik), सिन्नरला ३ (Sinnar), दिंडोरीत सहा मि.मि. पाउस झाला.

बाकी मालेगाव, नांदगाव, चांदवड, बागलाण व येवला तालुके काल कोरडेचे होते. यंदा पावसाने ओढ दिल्याने खते, बियाने विक्रेतेही चिंंतेत हेाते.

रेनकोटही काढायची वेळ आली नव्हती. आता मात्र आषाढ सरी कायम राहतील असा अंदाज आहे. हवामान खात्यानेही आगामी पाच दिवस चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

पाऊस चांंगला होऊ लागल्यास पाणी कपातीचे संंकटही दुर होणार आहे. काल इगतपुरीत अतीवृष्टीमुळे रेल्वे वाहतुकीवर परीणाम झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com