PhotoGallery | दिंडोरी : शिंदवड परिसरात जोरदार पाऊस

झाडे कोसळली, विजपुरवठा खंडीत
PhotoGallery | दिंडोरी : शिंदवड परिसरात जोरदार पाऊस

ओझे । Oze

दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे आज ३.३० पूर्वमोसमी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.

यावेळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले असून अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे तालुक्याच्या अन्य भागातही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाने हजेरी लावली आहे.

या पुर्वमोसमी वादळी पावसाने द्राक्षबागेतील काड्याचे नुकसान झाले तर काही ठिकाणी सिमला मिरचीच्या शेडनेटचे नुकसान झाले आहे. दोन तास अचानक पडणाऱ्या पावसाने परिसरातील नाल्यांना पूर येऊन शेतांमध्ये साचले. त्यांप्रमाणे दिंडोरी व चांदवड तालुक्यातील जोडणा-या फरशीवरून पाणी पडल्यामुळे वाहतुक बंद झाली होती.

Related Stories

No stories found.