
नाशिक | Nashik
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह अनेक जिल्ह्यांत पावसाने (Rain) दडी मारल्याने शेतकरी (Farmer) चिंतेत सापडला आहे. शेतकऱ्यांनी नुकतीच भाताची लागवड केली आहे. पंरतु, याच भाताला पाणी नसल्याने भाताचे क्षेत्र अगदी कोरडे ठाक पडले आहे. मात्र,अशातच आता जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे...
जिल्ह्यातील निफाड परिसरातील (Nifad Area) आज दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास निफाड, नैताळे, उगाव, पालखेड, कुंभारी नांदुर्डी, चांदोरीसह अन्य भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. सध्या निफाडच्या सर्वच भागात खरीपाची धुळधान झाल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे.
तर दुसरीकडे तीन महिने झाले तरी पाऊस पडला नसल्याने निफाडच्या सर्वच नद्या कोरड्याठाक पडल्या असून जलसाठे संपण्याच्या मार्गावर आहे. तसेच शेतातील पिके (Crops) करपू लागल्याची परिस्थिती असतांना आजचा पाऊस दिलासा देणारा असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.