
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मागील आठवड्यात नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. तसेच या पावसामुळे शेतकऱ्यांना (Farmers) देखील काही प्रमाणात धीर मिळाला होता. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता. यानंतर पाऊस पुन्हा कधी कोसळणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले होते...
त्यानंतर आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरातील (City) काही भागांत तर पाच वाजेच्या सुमारास काही भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील एमजी रोड, शालीमार, सीबीएस यासह आदी परिसरात पाच वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला.
तर दुपारच्या सुमारास आंबेडकर नगर परिसरात पाऊस कोसळला. यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान आज सकाळपासून शहरातील काही भागांत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) असल्याचे चित्र होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास ढग दाटून आले होते. यानंतर काही भागांत दुपारच्या तर काही भागांत पाच वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली.