
नाशिक | Nashik
शहरासह जिल्ह्यात पावसाने (Rain)गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. शहरात (City)आज सकाळी ढगाळ वातवरण होते. तर दुपारी तासभर ऊन पडले होते. त्यानंतर मात्र पुन्हा ढगाळ वातावरण झाल्याने सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली...
सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शहरातील रस्त्यांवर पाणीच-पाणी (Water) साचल्याचे दिसून आले. तसेच दिवाळीनिमित्त (Diwali) बाजारात साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे विक्रेत्यांचीही (Sellers) धावपळ झाल्याचे दिसून आले. तर ग्रामीण भागात पावसामुळे भात शेतीचे (Rice Farming) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.