Photo Gallery : नाशिकला मुसळधार

Photo Gallery : नाशिकला मुसळधार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरासह परिसरात (Nashik District) आज दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाने आज हजेरी लावल्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला.

आज शनिवार असल्यामुळे आणि उद्याचा रक्षाबंधनाचा सण (Saturday and Rakshabandhan) साजरी करण्यासाठी अनेकांनी नाशिकच्या मध्यवर्ती असलेल्या शालीमार (Shalimar), रविवार कारंजा (Ravivar karanja) परिसरात खरेदीसाठी गर्दी केली होती.

यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांची यावेळी तारांबळ उडाली. दुसरीकडे अनेक गर्दीच्या भागात स्मार्टसिटीची कामेही सुरु आहेत, अनेक ठिकाणी चाऱ्या खोदुन ठेवल्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

कालपर्यंत नाशिकला (Nashik) २६, इगतपुरीत (Igatpuri) ४३, दिंंडोरीत (Dindori) ३३, पेठला (Peth) ३१, त्र्यंबक ला १९ नांदगावला ७४, कळवणला ६०, बागलानला ३०, सुरगाण्यात ४६, देवळ्यात ३३, निफाडला २२, सिन्नरला ३७, येवल्यात ३७, चांदवड (Chandwad) १३ मिलीमिटर पावसाची नोंंद झाली.

एकाच दिवशी ५०४ मिली मिटर पाऊस पडल्याने सरसरी पाऊस ६३ ट्क्के झाल्याचीही नोंद झाली होती. यानंतर आज सकाळपासून अनेक भागात पावसाने मुसळधार हजेरी लावल्यामुळे ही टक्केवारी वाढणार असून यामुळे परिसरातील धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com