Video : त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक दुकानांत शिरले पाणी

Video : त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक दुकानांत शिरले पाणी

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारून असलेल्या पावसाने अखेर नाशिक जिल्ह्यात कालपासून हजेरी लावली आहे. दिवसभर पावसाच्या सरी सुरु होत्या. त्र्यंबकेश्वर शहरात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शहरातील गल्ल्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

अनेकांचे वाहनेही यावेळी पाण्यात गेली होती. मध्यरात्री परिसरातील नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. शहरातून वाहून आलेले पाणी अरुंद गल्लीतून नदीत जात असताना अनेक दुकानात शिरले. याठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकी पाण्याखाली गेल्या. अनेक मोठी वाहनेही पाण्यात असल्याचे दिसून येत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com