नांदगावात अतिवृष्टी; पिकांना फटका बसण्याची शक्यता

नांदगावात अतिवृष्टी; पिकांना फटका बसण्याची शक्यता

नांदगाव। प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर, मोरझर, परिसरामध्ये गुरुवारी सांयकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे बराच वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. या परिसरात ढगफुटी सारखा प्रकार झाला. त्यामुळे परिसरातील ओढे नाले यांना मोठ्या स्वरूपामध्ये पूर आला होता. तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर मोठे नुकसान झाले आहे....

नांदगाव तालुक्यात बऱ्याच दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडले होते. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे गुरुवारी आगमन झाले आहे.

पावसामुळे नांदगाव तालुक्यातील पेरण्या खोळंबलेल्या होत्या. शेतीला पाण्यासाठी पावसाची मोठी गरज असते.

गुरुवारी पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील भागात कापूस, मका, बाजरी, आदी पिकांच्या पेरणीला बळीराजाने सुरुवात केली आहे.

तालुक्यातील लक्ष्मीनगर,मोरझर परिसरात मोठ्या स्वरूपात पाऊस बरसला आहे. तर पाऊस मुसळधार पडत असल्यामुळे या परिसरातील सर्व ओढे नाले ओसंडून वाहत होते.

ओढे नाले ओसंडून वाहत असल्यामुळे शेतातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे तसेच शेतातील खत खाद्यदेखील अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहे.त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com