Video : मनमाडला मुसळधार; शेतकरी सुखावला, पाहा व्हिडीओ

मनमाड | प्रतिनिधी Manmad

गेल्या महिन्याभरा पासून दडी मारून बसलेल्या पावसाचे मनमाड शहर परिसरात दमदार पुनरागमन झाले असून तीन दिवसा पासून पावसाची रिपरिप सुरू आहे. (heavy rain in Manmad)

अधूनमधून जोरदार पाऊस होत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सलग तीन दिवसा पासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले असल्याने बळीराजावर आलेले दुबार पेरणीचे संकट टळले त्यामुळे शेतकरी सुखावला.

दुसरीकडे पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असल्याने जीवघेण्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, तीन दिवसा पासून पाऊस होत असला तरी नदी-नाल्याना अजून पूर आलेला नाही त्यामुळे मोठ्या पावसाची शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रतीक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com