Video : पिंपळगाव, कसबे सुकेणेला मुसळधार पावसाने झोडपले

Video : पिंपळगाव, कसबे सुकेणेला मुसळधार पावसाने झोडपले

कसबे सुकेणे/पिंपळगाव | वार्ताहर Nashik

नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात (Heavy rain alert in North Maharashtra) अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज दुपारी अचानक निफाड (Niphad) तालुक्यातील पिंपळगाव (Pimpalgaon) येथे आलेल्या पावसाने सर्वत्र तारांबळ उडाली. पंचक्रोशीत मुसळधार जलधारा बरसल्याने सकाळपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून काहीशी सुटका पिंपळगाव पंचक्रोशीवासियांची झाली....

येथील उड्डाण पुलाच्या खाली असलेल्या बोगद्यामध्ये पाणी साचले होते. शेतातही पाणी साचल्यामुळे अनेकांनी ढगफुटी झाल्यागत पाऊस झाल्याची प्रतिक्रिया 'देशदूत'शी बोलताना दिली.

गेल्या पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सलग दोन दिवस कसबे सुकेणे (Kasabe Sukene) व परिसराला झोडपून काढले. बंगालच्या उपसागरात गुलाब नावाच्या वादळ व कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

या पावसामुळे सोयाबीन व मका यासारख्या पिकांना दिलासा मिळाला असला तरी परिसरात द्राक्ष छाटणी वेग घेतला असताना पाऊस पडत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे.

काही शेतकऱ्यांना द्राक्ष काडीला दुसर्‍यांदा पेस्ट लावावी लागल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. परिसरात सध्या मामा जम्बो, फ़्लेम, काळी सोनाका, शरद सीडलेस, आदी द्राक्ष बागांना छाटण्यांना वेग आला आहे. अशातच पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा द्राक्ष छाटणीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com