इगतपुरीत मुसळधार

इगतपुरीत मुसळधार

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) मुसळधार पावसाने (Heavy rain) चांगला जोर धरला आहे. शनिवारी एकाच दिवसात सुमारे 45 मिलीमीटर पाऊस झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आत्तापर्यंत तालुक्यात 2600 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भावली (Bhavali Dam) व भाम धरणे शंभर टक्के भरले असून तुडूंब ओसंडुन वाहत आहे. काही धरणाच्या जल साठ्यामध्ये वाढ झाली आहे.

इगतपुरी शहरात धुवाधार पावसाने सर्वत्र गारवा पसरला असून कसारा घाट (kasara Ghat), घाटमाथा, महामार्गावर, शहराला धुक्याने वेढले असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.

विकेंड असल्याने भावली धरण परीसर व धबधब्याजवळ पर्यटकांनी (Tourists) असंख्य गर्दी करत निसर्गाचा आनंद घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. पर्यटकांच्या वाहनामुळे भावली धरण परीसरात मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.

तर दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी गणपती बाप्पा आगमना निमित्ताने खड्डे डागडुजीसाठी मुरूम ऐवजी लाल माती टाकण्यात आली होती. या लाल मातीमुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असुन खड्डे कमी होण्याऐवजी आणखी खडुयाची वाढ झाली. या जोरदार पावसाने ही लाल मातीही वाहून गेली असुन धो धो पडणार्‍या पाऊसामुळे ग्राहकांनी बाजारपेठेत येण्यास टाळल्याने बाजारपेठ मंदावली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com