शहरात अर्धा तास मुसळ'धार'

शहरात अर्धा तास मुसळ'धार'

नाशिक । Nashik

वरुणराजाने शुक्रवारी (दि.११) शहर परिसरात सायंकाळी जोरदार हजेरी लावत दाणाफाण केली. अवघ्या अर्धा तासात आठ मिली मीटर इतका पाऊस झाला.

दुकानदार, व्यावसायिक व वाहनचालकांची तारांबळ उडाली. पावसांमुळे सकाळपासून जाणवणारा उकाडयापासून दिलासा मिळाला.

आॅगस्टमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत जिल्ह्यावर आभाळमाया केली. सप्टेंबरमध्येही वरुण राजाने शहरासह जिल्ह्यावर कृपा कायम ठेवली आहे. मागील काही दिवसांपासून सकाळी उकाडा जाणवतो व दुपारनंतर अचानक आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरुन येते.

त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात होते हा अनुभव नाशिककरांना येत आहे. शुक्रवारीही त्याची प्रचिती आली. दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास शहर व उपनगरिय परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागांसह सिडको, सातपूर, आडगाव या ठिकाणी कोसळधार पहायला मिळाली.

अचानक झालेल्या धुवाधार पावसाने नागरिकांची तारांबळ झाली. अर्धा तासाच्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते. वाहनचालकांना वाहने थांबवून अडोशाच्या आधार घ्यावा लागला.

रस्तावरील विक्रेत्याची आवरसावर करताना धावपळ उडाली. पावसाने उकाडा नाहिसा होऊन वातावरणात गारवा पसरला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com