Video : दिंडोरी शहरात लसीकरणासाठी उडाली झुंबड

लस कमी नागरिकच जास्त
Video : दिंडोरी शहरात लसीकरणासाठी उडाली झुंबड

दिंडोरी । Dindori

दिंडोरी शहरात (Dindori city) लसीकरण (Corona Vaccination) करण्यासाठी प्रचंड झुंबड उडाली असून लस कमी (Vaccine Shoratge) आणि रांगा जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांचे नियोजन (District Immunization Officer) चुकले असल्याचे चित्र असून लस लोकसंख्येच्या प्रमाणात देण्याची मागणी होत आहे.

दिंडोरी शहराची लोकसंख्या तीस हजारच्या पुढे असून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात (Dindori Rural Hospital) फक्त १०० ते १५० आसपास लस येतात. दिंडोरी शहर असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात होते. पण लस कमी असल्याने वाद होतात. त्यात काही राजकीय पुढारी (Political Leaders) कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वशिलेबाजी करतात. त्यामुळे लस लवकर संपून जाते.

इतर खेडेगावात लोकसंख्या कमी असतानाही २०० लस दिली जात आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे नियोजन (Health Department Planning) चुकत असल्याचे स्पष्ट होत आहे. किमान सहा वाजेपासून ७ रांगा लागत असून ५०० च्या पुढे लोक उभे राहत आहेत.

रांगा जास्त असूनही लस मिळत नसल्याने चेंगरा चेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः दिंडोरी सह मोठ्या शहरांचे नियोजन करावे अशी मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com