जीवनशैली बदलल्यास हृदयविकार 'असंभव'

हृदयरोगतज्ञ डॉ. ऋषिकेश देसले यांचे प्रतिपादन
जीवनशैली बदलल्यास हृदयविकार 'असंभव'

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

समतोल आहार (balanced diet), ताणतणाव (stress) नसतील तर हृदयविकार (heart disease) रोखला जावू शकतो. आपली जीवनशैली (lifestyle) बदलल्यास हृदयविकार असंभव असल्याचे प्रतिपादन हृदयरोगतज्ञ (cardiologist) डॉ. ऋषिकेश देसले (Dr. Rishikesh Desale) यांनी येथे बोलतांना व्यक्त केले.

म. गांधी विद्यामंदिर संस्थेचे (mahatma gandhi vidyamandir sanstha) जनरल सेक्रेटरी माजीमंत्री डॉ. प्रशांत हिरे (Dr. Prashant Hirey) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मसगा महाविद्यालयात आरोग्य धन संपदा (aarogya dhan sampada) या योजनेंतर्गत आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करतांना हृदयरोग तज्ञ डॉ. ऋषिकेश देसले बोलत होते. प्राचार्य डॉ. डी.एफ. शिरुडे हे अध्यक्षस्थानी होते.

हृदयरोगापूर्वीचे लक्षणे (symptoms) कोणती तसेच ही लक्षणे आढळून आल्यास याबाबत घ्यावयाची काळजी तसेच हृदयरोग झाल्यानंतर आपण कुठली काळजी घ्यायची, याबाबत सखोल मार्गदर्शन डॉ. देसले यांनी करत चाळीसाव्या वर्षानंतर सर्वांनी बेसिक टेस्ट (basic test) करून घ्यावेत असा सल्ला देवून अँजॉग्राफी (angiography), एन्जोप्लास्टी (angioplasty), बायपास सर्जरी (bypass surgery) यांची देखील सविस्तर माहिती दिली.

प्राचार्य डॉ. शिरूडे यांनी देखील हृदय रोगाविषयी मार्गदर्शन करतांना डॉ. देसले यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनिष सोनवणे यांनी तर प्रास्ताविक प्रा. डॉ. सी. एम. निकम यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रा. डॉ. नरेंद्र डोखे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एन.बी. बच्छाव यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. योगेश शास्त्री, अर्जुन नेरकर, प्रा. रवींद्र मोरे, प्रा. अजिंक्य ठाकरे, आर.एच. शेलार, जयंत कट्यारे उपस्थित होते. व्याख्यानास प्राध्यापक, शिक्षक, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील रासेयो, छात्र सेना, विद्यार्थी विकास मंडळ व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे (blood donation camp) आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. डी.एफ. शिरुडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राध्यापक, सेवकांनी रक्तदान करत शिबीर यशस्वी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com