इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : जेल या बेल, उद्या होणार फैसला

दोघे संशयित अद्यापही फरार
इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : जेल या बेल, उद्या होणार फैसला

नाशिक | Nashik

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणातील (Igatpuri Rave Party) नायजेरियन गुन्हेगार पीटर उमाही(Naijerian Pitar Umaji), हीना पांचालसह ((Actress Heena Panchal) सर्व संशयितांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले असता सुमारे तीन तास सुनावणी (Igatpuri Court) चालली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत (Court Closet) रवानगी केली.

दरम्यान, संशयितांच्या वकिलांकडून न्यायालयात जामीन (Bail Appeal) मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर गुरुवारी आणि शनिवारी युक्तिवाद झाला. येत्या सोमवारी न्यायालयाकडून याबाबत निर्णय सुनावला जाणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) छापा टाकून उधळून लावली होती. या कारवाईत बॉलिवूड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकूण २२ तरुण-तरुणींकडून गांजा, हुक्का, चरस, कोकेन यांसारख्या मादक अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी संशयितांविरुद्ध एनडीपीएसअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज पुरविणाऱ्या संशयित नायजेरियन उमाही पीटरच्या संपर्कातील दोन संशयित अद्यापही फरार आहेत. त्यांच्या मागावर पोलिसांची पथके असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. पीटर याच्याविरुद्ध यापूर्वीही काशिमीरा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com