ग्रामीण महिलांना आरोग्यदायी भेट : डॉ. पवार

ग्रामीण महिलांना आरोग्यदायी भेट : डॉ. पवार

अंबासन । वार्ताहर | Ambasan

ग्रामीण रुग्णालयांमधील (Rural hospital) प्रसुतीसेवांचा स्तर उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून प्रयत्न करण्यात येत आहेत.

विस्तारीत प्रसूतीगृहांच्या (maternity ward) रूपाने ग्रामीण भागातील महिलांना शासनाकडून आरोग्यदायी भेट (healthy gift) उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी केले आहे.

बागलाण तालुक्यातील (baglan taluka) नामपूर ग्रामीण रुग्णालयात (Nampur Rural Hospital) राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Department of Public Health) संयुक्त वतीने विस्तारीत प्रसूतीगृह इमारतीचे लोकार्पण (Inauguration of Maternity Hospital Building) केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात (District Surgeon Dr. Ashok Thorat), निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार (Resident Medical Officer Dr. Anant Pawar), डॉ. सुनील राठोर, नामपूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र पाटील यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष तर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Z.P. Chief Executive Officer Leena Bansod), जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर हे दुरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. पवार पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नामपूर ग्रामीण रूग्णालयात विस्तारीत इमारतीच्या माध्यमातून गरीब रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा (Health Service) मिळणार आहेत. स्वतंत्र प्रसूतीगृह इमारतीमुळे ‘सन्मानपूर्वक मातृत्व’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या योजनेला बळ मिळेल.

तसेच संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मदत होणार असून गुंतागुंतीच्या प्रसूती व सर्वसाधारण प्रसूती मातांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध होणार आहेत. नवजात अर्भकांच्या आरोग्याच्या समस्या आणि त्यांना होणारा संसर्ग कमी होण्यासोबतच नवजात अर्भकांचा मृत्यू व माता मृत्यू रोखण्यास हातभार लागणार आहे.

यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनामार्फत सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही देखील राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी दिली. याप्रसंगी अशोक सावंत, नामपूर सरपंच रेखा पवार, आबा बच्छाव, ग्रा.पं. सदस्य शरद पवार, दादा भामरे, आदिंसह आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com