आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी करा; मविआचे कार्यकर्ते आक्रमक

आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी करा; मविआचे कार्यकर्ते आक्रमक

सटाणा । प्रतिनिधी | Satana

मराठा समाजाबद्दल (Maratha Community) आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive statement) करणार्‍या आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज तहसीलदारांना (Tehsildar) निवेदन (memorandum) देत केली.

मराठा समाजाला आरक्षण (Reservation) मिळविण्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष (All political parties) प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना आरक्षणाची खाज सुटली आहे, असे आक्षेपार्ह बेजबाबदार विधान केले आहे.

त्यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व अपमानित करणारे असल्याने त्यांचा निषेध करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करून त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मराठा समाजाच्या (Maratha Community) आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात असून सर्वच राजकीय पक्ष व विविध संघटना यासाठी प्रयत्नशील आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरू आहे. 2014 काँग्रेस (congress), राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) व शिवसेना (shiv sena) आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे हे आरक्षण संपुष्टात आले आहे.

आजही हा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न सुरू असतांना राज्यातील एका जबाबदार मंत्र्यांनी मराठा समाजाबद्दल केलेले बेताल वक्तव्य हे अत्यंत निषेधार्थ असल्याचेही निवेदनात (memorandum) म्हटले आहे. दरम्यान, तहसीलदारांनी निवेदनाचा स्वीकार करीत आपल्या भावना शासनापर्यंत कळविण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. संजय चव्हाण,

तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, शिवसेना बागलाण, मालेगाव विधानसभा संघटक लालचंद सोनवणे, शहराध्यक्ष सुमित वाघ, मनोज सोनवणे, राजेंद्र सोनवणे, संजय पवार, शरद शेवाळे, लक्ष्मण सोनवणे, किरण मोरे, अमोल बच्छाव आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com