माता सुरक्षित-घर सुरक्षित अभियानास प्रारंभ

शिबीराव्दारे महिलांची आरोग्य तपासणी व उपचार : डॉ. चौरे
माता सुरक्षित-घर सुरक्षित अभियानास प्रारंभ

डांगसौंदाणे । वार्ताहर | Dangsaundane

शासनाच्या आरोग्य विभागामार्फत (Department of Health) राज्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital) व आरोग्य उपकेंद्रांमध्ये (Health sub-centres) नवरात्र उत्सव (navratrotsav) काळात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ (Mother is safe, home is safe) या अभियानास येथील डांगसौंदाणे ग्रामीण रूग्णालयात (Dangsaundane Rural Hospital) मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांच्या सुचनेनुसार येथील ग्रामीण रुग्णालयात तरूणी व महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे (Health check up camp) उद्घाटन बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. सुरेश वाघ, पत्रकार निलेश गौतम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश चौरे, बुंधाटे उपसपंच अशाबाई गायकवाड, ग्रा.प. सदस्य अनिता चव्हाण, कैलास गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या शिबिरात नऊ दिवस किशोरवयीन मुली, गरोदर माता व महिलांना विविध आरोग्य विषयक तक्रारीचे निवारण (Redressal of health complaints) करण्यात येवून मोफत औषधोपचार (Free medication) व स्त्रीरोग तज्ञांतर्फे मार्गदर्शन (Guidance by gynecologists) केले जाणार असल्याने जास्तीतजास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश चौरे (Medical Superintendent Dr. Jagdish Chaure) यांनी यावेळी बोलतांना केले.

ग्रामीण विशेषत: आदिवासी भागाची (tribal area) गरज ओळखून ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. हा उद्देश लक्षात ठेवत वैद्यकीय पथकाने कायम निस्वार्थ भावनेने सेवा देत आरोग्य सेवा (Health care) सुदृढ करावी, अशी अपेक्षा प्रमुख अतिथी कृउबा संचालक संजय सोनवणे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना व्यक्त केली. या शिबिरात डॉ. जगदीश चौरे, हेमंत बोरुडे, शारदा गावित, सागर पाटील आदी डॉक्टरांतर्फे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येवून उपचार तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे.

शिबीराच्या यशस्वीतेसाठी ज्योती महाजन, आम्रपाली भामरे, सायली निकम, अश्विनी वनीस, हेमंत देवरे, करण शेवाळे, विकास आव्हाड, औषध निर्माण अधिकारी नीता देवरे, क्ष-किरण अधिकारी नितीन ठाकरे, प्रयोगशाळा अधिकारी यशवंत महाजन आदी वैद्यकिय अधिकारी, सेवक परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश भामरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुग्णालय कार्यालयीन अधीक्षक रमेश जेजुरकर व सहकार्‍यांनी योगदान दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com