वापराविना शासकीय निवासस्थाने धुळखात पडुन

वापराविना शासकीय निवासस्थाने धुळखात पडुन

पेठ । प्रतिनिधी Peth

पेठ (Peth) येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी (Officers and staff of rural hospitals) यांच्या निवासासाठी सन 2013 मध्ये मंजुरी मिळुन सुमारे सव्वा दोनच कोटी रुपये खर्चाचे निवासस्थाने (Residences) बांधून पुर्ण करण्यात आले आहे मात्र सर्व सदनिकांचे काम पुर्ण होऊन पाच वर्षे होत आली. तरीही या सदनिकेत कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी राहण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

इमारतींना (Buildings) पाणी (water) पुरवठ्यासह वीज (Electricity) जोडणी आदींसह सर्व सोयी सुविधा संबंधित बांधकाम विभागाकडून (Construction Department) उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. या सदनिका आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत ही करण्यात आल्या. परंतु या ठिकाणी कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी राहण्यास तयार नसल्याने शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधलेल्या या इमारती विना वापराने धुळखात ओस पडल्या आहे.

अशा बारा सदनिका सर्व सोयी सुविधासह तयार असुनही त्यात कोणी राहत नसल्याने वापरा विना या सदनिकाची किरकोळ स्वरुपात पडझड होत आहे. खिडक्यांच्या तावदानां वरील काचांची फुटतुट सुरु आहे.

आरोग्य विभागाच्या (Department of Health) अधिकारी व कर्मचारी वर्गाचा हा वेळ काढु पणा व चालढकल केली जात असल्याचे सांगितले जाते. या सदनिकेत अधिकारी व कर्मचारी राहण्यास आले तर येथील रु्ग्नांनाही तात्काळ आरोग्य सेवा (Healthcare) मिळण्यास मदत होईल त्याच बरोबर अनेक अडचणी पासुन सुटका होईल अशी मागणी येथील नागरिकांतु होत आहे.

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक 1, वैद्यकीय अधिकारी 3, नेत्रचिकित्सा अधिकारी 1, अधिपरिचारिका 7, सहाय्यक अधिक्षक 1, क्ष-किरण तत्रंज्ञ 1, प्रयोग शाळा तत्रंज्ञ 1, प्रयोग शाळा सहाय्यक 1, पाणी नमुने प्रयोग शाळा तत्रंज्ञ 1, कनिष्ठ लिपिक 1, टंकलेखक लिपिक 1, औषध निर्माण अधिकारी 2,

शिपाई 1, वाहन चालक 1, कक्षसेवक 4, सफाईगार 2, दंत सहाय्यक 1, फिरती आश्रम शाळा वैद्यकीय पथकाचे वैद्यकीय अधिकारी 2, एएनएम 1, औषध निर्माण अधिकारी 1, वाहन चालक 1, अशी वर्ग एक ते चारची पदे मंजूर आहे. या सर्वासाठी मुख्यालयी राहण्यासाठी येथे निवासस्थाने बांधून पुर्ण झाली मात्र ही निवासस्थाने निवासाविना धुळखात पडुन आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com