चाळीशीनंतर आरोग्य तपासणी आवश्यक

वैद्यकिय अधिक्षक डॉ. हितेश महाले यांचे प्रतिपादन
चाळीशीनंतर आरोग्य तपासणी आवश्यक

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

सद्यस्थितीत धावपळीचे जीवन (life) लक्षात घेता चाळीशीनंतर वेळोवेळी आरोग्याची तपासणी (health check) करणे सदृढ प्रकृतीसाठी आवश्यक बनले आहे. उत्तम आरोग्यासाठी मद्य (Alcohol), धुम्रपान (Smoking) व साखर या शुभ्र पदार्थांपासून लांब राहणे काळाची गरज बनली आहे.

आजारावर नियंत्रणासाठी पथ्य पाळणे सर्वांसाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन सामान्य रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. हितेश महाले यांनी येथे बोलतांना केले.येथील के.बी.एच. विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयात माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून पालकांसाठी आयोजित व्याख्यानात मार्गदर्शन करतांना डॉ. महाले बोलत होते. प्राचार्य प्रविण पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

मनोविकार तज्ञ डॉ.राजेंद्र शिरसाठ, पालक-शिक्षक संघाचे जितेंद्र पाटील, संगीता सूर्यवंशी, अरुण शेवाळे, उपप्राचार्य रवींद्र शिरुडे, राजेंद्र पाटील, पर्यवेक्षक संजीव महाले, पर्यवेक्षक संजय शिंदे, नितीन गवळी, कार्यालयीन प्रमुख पांडुरंग शेलार, प्रा. शितल शिंदे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपिठावर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी चाळीशीनंतर उद्भवणारे आजार (Illness) व घ्यावयाची काळजी या विषयावर डॉ. महाले यांनी सखोल मार्गदर्शन केले. दिवसभर कष्ट केले म्हणजे शरिर तंदुरूस्त राहिल, असे नाही. त्यासाठी नियमित व्यायाम (Exercise regularly) करणे आवश्यक आहे. मद्य, धुम्रपान, साखर, मैदा आदी पांढरे पदार्थ शरिराला अपायकारक ठरत असल्याचे दिसून आल्याने यांच्यापासून शक्यतो लांब राहणे गरजेचे आहे.

दमा (Asthma), हृदयरोग (Heart disease), मधुमेह (Diabetes), रक्तदाब (Blood pressure) हे आजार औषधे घेतली तरी संपुष्टात येत नाही. त्यांच्या अटकावासाठी पथ्य पाळणे फार आवश्यक आहे. वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याची तपासणी (Health check) सातत्याने करत राहणे गरजेचे बनले असल्याचे मत डॉ. महाले यांनी व्यक्त करत करोनाचे (corona) संकट नियंत्रणात आले असले तरी टळलेले नाही. शाळा (school), महाविद्यालय (college) सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन केले.

यावेळी मार्गदर्शन करतांना मनोविकार तज्ञ डॉ. राजेंद्र शिरसाठ यांनी एकत्र कुटूंब पध्दतीची आवश्यकता विषद केली. घरातील तणावाच्या वातावरणाचे दुष्पपरिणाम मुलांवर होत आहे. त्यामुळे घरात नेहमी खेळकर व आनंदी वातावरण राहिल याची दक्षता पालकांनी घ्यावी. मुलांशी नेहमी आपुलकीने संवाद साधत त्यांचे मन समजून घेण्याचा प्रयत्न पालकांनी करावा, असे आवाहन डॉ. शिरसाठ यांनी केले.

प्राचार्य प्रविण पाटील यांनी मार्गदर्शन करतांना माजीमंत्री प्रशांत हिरे यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतीक कार्याची माहिती विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र शेवाळे यांनी तर आभार शशिकांत पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख राजेश धनवट, एस.के. सूर्यवंशी, एम.डी. भामरे तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com