कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी

कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी

विंचूर। वार्ताहर | Vinchur

हनुमाननगर येथील युवा मंच (Youth Forum) व स्पंदन हॉस्पिटलच्या (Spandan Hospital) विद्यमाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत (Integrated Child Development Services Scheme) देवगाव (devgaon) प्रा.आ. केंद्राच्या बीटमधील हनुमाननगर, भरवस, वाहेगाव, वाकद, मानोरी, गोळेगाव येथील

अंगणवाडीतील (Anganwadi) कुपोषित बालके (Malnourished children) व अन्य आजार असलेल्या बालकांची स्पंदन हॉस्पिटलचे संचालक डॉ.मंगेश रायते (Dr. Mangesh Raite, Director, Children's Vibration Hospital) यांनी मोफत आरोग्य तपासणी (Free health check up) करून आवश्यक असलेल्या बालकांना मोफत औषधोपचार करून आहाराबाबत पालकांना मार्गदर्शन केले.

युवा मंचचे संस्थापक किशोर दरेकर, अध्यक्ष शेखर लोळगे, हर्षल काळे, डॉ. मंगेश रायते, पर्यवेक्षिका वंदना गोलवाड यांनी शिबिराचे आयोजन केले. शिबिर यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका चंद्रकला जगताप, संगीता ठुबे, बेबी शिंदे, सुरेखा सालमोठे, सुशीला खंडाळे, मनकर्णिका मुदगुल, संगीता संभेराव, शोभा शेळके, सुरेखा चतूर, पद्मा जाधव यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com