महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाचा उपक्रम

ताहाराबाद । वार्ताहर | Taharabad

मुल्हेर (Mulher) ता. बागलाण (baglan taluka) येथील लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या (Ladshakhiya Vani Samaj Mahila Mandal) वतीने महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे (Health guidance camp for women) आयोजन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी श्री उध्दव महाराज संस्थानाच्या (Shri Uddhav Maharaj Sansthan) प्रमुख सुचिता पंडित (Suchita Pandit) तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं. सदस्या प्रीती कोठावदे, इनरव्हील क्लब अपेक्स अध्यक्षा योगिता शिरोरे, सचिव सुवर्णा जंगम, संस्थापक अध्यक्षा वर्षा शिरोडे, अपर्णा येवलकर, माधुरी अमृतकर, दर्शना मेतकर, प्रिया दशपुते, आशा लोखंडे, अ‍ॅड. रुपाली पंडित, आरोग्य सल्लागार सोनिका पगार, गोकुळ पगार, डॉ. मनोज क्षीरसागर आदी उपस्थित होते.

महिला सप्ताहानिमित्त (Women's Week) आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) व भगवान धन्वंतरी प्रतिमा पूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. महिलांना आपली दैनंदिन कामे करताना अनेक समस्या व आजारांचा सामना करावा लागतो. या आजारांपासून खबरदारी घेण्यासंदर्भात डॉ. मनोज क्षिरसागर यांनी मार्गदर्शन केले व कर्करोगाविषयी (Cancer) माहिती दिली.

आरोग्य सल्लागार सोनिका पगार यांनी सर्व महिलांची तपासणी करून त्याना दैनंदिन जीवनात आहार कसा असावा तसेच वजन कमी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची संकल्पना माया येवला यांनी मांडली तर रुपाली येवला व वैशाली येवला यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाती कोठावदे, दीपाली येवला, रजनी येवला, योगिता येवला, विद्या येवला, निता येवला, शोभा येवला, रत्ना येवला,

दुर्गा येवला, भाग्यश्री अमृतकर, प्रांजल कोठावदे, आदिंनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पूनम बागुल, सिद्धी येवला, यामिनी येवला, भाग्यश्री येवला, कलाताई सूर्यवंशी यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com