बाजार समितीत शेतकर्‍यांची आरोग्य तपासणी

बाजार समितीत शेतकर्‍यांची आरोग्य तपासणी

पंचवटी। वार्ताहर Panchavati

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ( Nashik Agricultural Produce Market Committee ) व एसएमबीटी क्लिनिक ( SMBT Clinic ) यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवटी मार्केट यार्डमध्ये आयोजित एकदिवसीय सर्वरोग निदान, तपासणी व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जवळपास 150 शेतकर्‍यांनी शिबिराचा लाभ घेत विविध तपासण्या करून घेतल्या.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बाजार समिती सभापती देविदास पिंगळे, संचालक दिलीप थेटे, लक्ष्मण मंडाले, सचिव अरुण काळे, घोलप, तुपे, बागूल आदी कर्मचारी उपस्थित होते. सध्या करोनाचा प्रादुर्भाव असला तरी जीवनावश्यक वस्तू म्हणून हजारो शेतकरी बाजार समितीत शेतमाल घेऊन येत असतात. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविणार्‍या बाजार समितीने एसएमबीटी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवटीतील मुख्य बाजार आवारात सर्व रोग तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते.

यात रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन, हृदयरोग, नेत्ररोग व नंबरचा चष्मा अश्या विविध तपासण्या करण्यात आल्या. यासाठी डॉ.दिव्या चित्रे, देवांशी ठाकरे, साक्षी राम, परिचारिका आशा कोकले, श्यामना गावित, ‘एसएमबीटी’चे मार्केटिंग विभागाचे उपव्यवस्थापक पंकज भामरे, निलेश परझने, उमेश खोमणे यांनी परिश्रम घेतले.

बाजार समिती शेतकर्‍यांसाठी असून, त्यांच्या बळावरच आज समिती उभी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची सुरक्षा आणि आरोग्याची काळजी घेणे समितीचे कर्तव्य आहे. यापुढेही अशीच शिबिरे राबविण्याचा मानस आहे.

- देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

मी ढोबळी मिरची घेऊन बाजार समितीत आलो होतो. शेती व्यवसाय असल्याने स्वतःच्या प्राथमिक आरोग्य चाचण्या करण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. मात्र बाजार समितीत शिबिर सुरू असलेले बघून मी माझ्या सर्व तपासण्या करून घेतल्या. विशेष म्हणजे सर्व तपासण्या मोफत झाल्याने आर्थिक बचतही झाली.

- विशाल बेंडकुळे, शेतकरी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com