शिक्षकांच्या पायी दिंडीस मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा
नाशिक

शिक्षकांच्या पायी दिंडीस मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा

औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान द्यावे, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित व अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण मिळावे, यासाठी औरंगाबाद येथून चार शिक्षक अन्नत्याग पायी दिंडीने मंत्रालयाकडे निघाले आहेत.

नवयुग शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रा. गजानन खैर, अनिस कुरेश यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. अन्नत्याग पायी दिंडी दहाव्या दिवशी बुधवारी (दि.५) निफाड येथे आली असता नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकार्‍यांनी निफाड येथे आंदोलकांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला.

दरम्यान, १०० टक्के अनुदान जाहीर करून शब्द पाळावा, अशी मागणी नाशिक मुख्याध्यापक संघाने शिक्षणमंत्र्यांकडे मागणी केली आहे. प्रा. गजानन खैरे यांच्यासोबत पायी प्रवास करून राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे यांच्या वतीने ३६ जिल्ह्यातून पाठिंबा देण्याचे आश्वासन महामंडळाच्या वतीने एस.बी.देशमुख यांनी दिले.

गत ५ वर्षापासून नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ प्रत्येक आंदोलनात सक्रीय असून प्रचलित नियमासाठी महसूल मंत्रीबाळासाहेब थोरात,आमदार सुधीर तांबे, आमदार किशोर दराडे, आमदार विक्रम काळे यांना अनेकवेळा निवेदन देऊन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यात नाशिकचे २० टक्के अनुदानित कृती समितीचे सर्व पदाधिकारी होते. अर्धनग्न आंदोलनात मुख्याध्यापक संघ प्रत्यक्षात आझाद मैदानावर उपस्थित होता.

आताही संघातर्फे पाठिंबा देण्याचे आश्वासन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ यांच्या वतीने सचिव एस.बी.देशमुख व निफाड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोमसे यांनी नवयुग शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे यांना निवेदन देत पाठिंबा दिला. यावेळी वसंत पानसरे, कमलेश राजपूत, अमोल निकम, अमोल आहेर,युवराज गायकवाड, राहुल दवते, विजय पगार, समीर जाधव, संतोष बोहाडे, साहेबराव बर्डे, महेश आहिरे, दत्तात्रय थेटे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com