मुख्याध्यापक संघाची आज बैठक
नाशिक

मुख्याध्यापक संघाची आज बैठक

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी

शिक्षकांची निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीचे शेकडो प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत.यासंदर्भात नाशिक जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि.६) दुपारी १२ वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयात बोलाविण्यात आली आहे.

करोनाच्या महामारीमुळे गेली अनेक दिवस अधिकाऱ्यांबरोबर झुम बैठका चालू आहेत.त्याच्यातून फार काही निष्कर्ष निघत नाहीत, असे निदर्शनास आले आहे.याबाबत मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली.झालेल्या चर्चेप्रमाणे नाशिकचे शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील यांच्यासमवेत गुरुवारी (दि.६) दुपारी बारा वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयात ठराविक पदाधिकाऱ्यांची सोशल डिस्टंसिंग चे पालन करून बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

बैठकीस लेखाधिकारी कार्यालयाचे प्रमुख खडसे तसेच वेतन पथक अधीक्षक उदय देवरे हेही उपस्थित राहणार आहेत.निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणीचे शेकडो प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत.हे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत न पाठविता थेट लेखा अधिकाऱ्याकडे मुख्याध्यापकांनी पाठवावेत व तिकडूनच परस्पर वेतन निश्चिती करून घ्यावी,अशी जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी आहे. त्या मागणीवर मुख्याध्यापक संघ ठाम राहणार असून ही प्रमुख मागणी गुरुवारच्या बैठकीमध्ये करणार आहे.

जिल्हाभरातील मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या काही प्रमुख अडीअडचणी व मागण्या असतील तर त्यांनी कळवाव्यात, असे आवाहन अध्यक्ष गुलाबराव भामरे,कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, कार्यवाह आर. डी. निकम,के.एल.चव्हाण,के.के. अहिरे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com