काेऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याचा ‘ताप’; मुख्याध्यापकांचे वाढले टेंन्शन

काेऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याचा ‘ताप’; मुख्याध्यापकांचे वाढले टेंन्शन

नाशिक | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुख्य परीक्षा केंद्रांवर पाठविलेल्या कोऱ्या उत्तर पत्रिका व इतर शैक्षणिक साहित्य सांभाळण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर पडली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला आहे. या उत्तरपत्रिकांचे अद्याप प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर वितरण केलेले नाही. त्यामुळे बहुतांश मुख्याध्यापक-प्राचार्य निश्चिंत आहेत, असेही समजते...

मंडळाने बारावीच्या परीक्षांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य मुख्य परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवले आहे. या परीक्षा केंद्रांवरून प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कोऱ्या उत्तर पत्रिका नकाशे व तोंडी परीक्षेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य सध्या मुख्य परीक्षा केंद्राच्या ताब्यात आहे. मात्र, सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत हे साहित्य वाटल्यानंतर ते सांभाळण्याची मुख्याध्यापकांवरील जबाबदारी वाढणार आहे. दरम्यान,

करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा कधी घोषित केल्या जाणार आणि परीक्षा केव्हा होणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे या परीक्षांचा निकाल जाहीर करून पुढील प्रवेश प्रक्रिया केव्हा राबवणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

ताब्यातील साहित्य

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य आदी मुख्य परीक्षा केंद्रावर कस्टडीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com