नोकरीचे अमिष दाखवून लाखोंचा गंडा

नोकरीचे अमिष दाखवून लाखोंचा गंडा

सिन्नर । वार्ताहर Sinnar

मुबंई महानगर पालिकेत (Mumbai Municipal Corporation) नोकरीला लावून देण्याच्या अमिष दाखवून तीन तरुणांना 9 लाखांचा गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. मात्र, सिन्नर पोलिसांकडून (sinnar police) गेल्या 5 महिन्यांपासून गुन्हा दाखल करुन घेण्यात टाळाटाळ होत असल्याने ग्रामीणचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील (Rural Superintendent of Police Sachin Patil) यांच्या आदेशानंतर सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती तरुणांनी दिली.

शिंदेगाव (shindegaon), ता. जि. नाशिक (nashik) येथील अंबादास गिरिजाप्रसाद जाधव (31) हा तरुण बोरखिंड येथे संगणक परिचालक (Computer operator) म्हणून काम करतो. दरम्यान, बोरखिंड येथील रामभाऊ अशोक जाधव हा तरुणाकडे विवाह नोंदणीचे (Marriage registration) कागदपत्रे काढण्यासाठी आला असता त्याची अंबादासशी ओळख झाली. रामभाऊ जाधव याने मुबंई महानगरपालिकेत नोकरीला लागण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र लागत असल्याचे सांगितले.

त्याने तरुणास तुम्हालाही नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवल्याने तरुणाने होकार दर्शवला. यानंतर जाधव याने मुंबई महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक (Security guard) म्हणून कामाला असलेल्या प्रदिप अण्णा मोरे रा. जामखेड, जि. नगर यांच्याशी तरुणाचा संपर्क साधून दिला. मोरे याने तरुणाकडे 3 लाख 20 हजारांची मागणी केली.

तरुणाने 15 ऑक्टोबर 2018 रोजी 40 हजार मोरे याच्या बँक खात्यावर पाठवले. त्यानंतर उर्वरित पैशांसाठी रामभाऊ जाधव याने तरुणाकडे तगादा लावण्यास सुरुवात केली. त्यानुसार तरुणाने अडीच लाख रुपये रोकड व फोन पे द्वारे टप्याटप्याने जाधव याला दिली. यानंतर तरुणाने नोकरी लागण्याविषयी जाधवकडे तगादा लावला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

कोरोना (corona) असल्याने तुझे काम होऊ शकत नसल्याचे त्याने सांगितले. तरुणाने मोरे याच्याशी संपर्क साधला असता माझ्यापर्यंत 40 हजार रुपयेच आल्याचे त्याने सांगितले. तरुणाने जाधव व मोरे यांच्याकडे पैसे परत मागितले असता, दोघांनी नकार दिला. मात्र, अंबादास या तरुणासारखे अजूनही काही तरुणांना जाधव व मोरे यांनी गंडा घातल्याचे समोर आले.

याप्रकरणी अंबादास जाधव, बोरखिंड येथील विशाल दिनकर वागळे व विशाल अर्जुन भांगरे या तरुणांनी सिन्नर पोलिस ठाण्यात येत फिर्याद दाखल करण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांकडूनही अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तरुणांनी पोलिस अधिक्षक सचिन पाटील (Superintendent of Police Sachin Patil) यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागितली. पाटील यांनी सिन्नर पोलिस (sinnar police) ठाण्याला आदेश करुनही तीघा तरुणांची तक्रार दाखल करुन घेण्यात पोलिसांनी टाळाटाळ केली.

तरुणांनी पुन्हा पाटील यांच्याकडे जाऊन तक्रार केल्याने मंगळवारी (दि.15) पोलिसांनी अंबादासची तक्रार दाखल केली. याप्रकरणी रामभाऊ जाधव व प्रदिप मोरे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधिक्षक पाटील यांनी या तीन तरुणांना एक-एक करुन तक्रार दाखल करण्याची सुचना केल्याने काही दिवसांनी इतर दोन तरुणही जाधव व मोरे याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती अंबादासने दिली. सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचा प्रकार सिन्नर पोलिसांकडून झाल्याचा आरोप तरुणाने केला. त्यामुळे पुन्हा एकदा सिन्नर पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.

मोठी साखळी असल्याचा संशय

अंबादास जाधव या तरुणासह दोघांनी हिम्मत दाखवून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्धार केला. मात्र, यादरम्यान त्यांच्या असेही लक्षात आले की त्यांच्यासारखे अनेक तरुण नोकरीच्या अमिषापोटी बळी पडले आहे. या तीघांनी इतरांना एकत्र करुन फिर्याद दाखल करण्याची विनंती केली. मात्र, अनेकांनी भीतीपोटी तक्रार दाखल करण्याकडे पाठ फिरवल्याचे अंबादास जाधव यांनी सांगितले. त्यामुळे ही मोठी साखळी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com