महापालिकेने केले बाजार वसुलीचे खासगीकरण

महापालिकेने केले बाजार वसुलीचे खासगीकरण

नाशिक | प्रतिनिधी

महापालिकेला अपेक्षित ७० टक्के बाजार फी वसूलच होत नसल्याने वसुलीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात निविदा मागविण्याची तयारी सुरू आहे. बाजार फी वसुलीसाठी गत वर्षभरापासून हालचाली सुरू आहेत. कमिशन बेसवर ही वसुली करण्यासाठी ठेका देण्याची महापालिकेची तयारी आहे...

महापालिकेच्या वसुली यंत्रणेत मोठ्या प्रमाणात गळती आहे. मात्र, त्याच बरोबर ठेकेदार नेमल्यानंतर देखील त्यात गळती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे महापालिकेने इंटिग्रेटेड, हँडहेल्ड टर्मिनल या संगणकीय प्रणालीतून नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

२०१९ मध्ये बाजार फी वसुलीतून महापालिकेला ८७ लाख ४२ हजार तर २०२० मध्ये ६१ लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

केवळ अधिकृत फेरिवाल्यांचा विचार केला आणि एका फेरिवाल्यांकडून वीस रुपये याप्रमाणे फी गृहीत धरली तर एका दिवसात १ लाख ९० हजार रुपये मिळतात. म्हणजेच महिन्याला ५७ लाख तर वार्षिक पावणे सात कोटी रुपये मिळू शकतात.

मात्र, प्रत्यक्षात ७० टक्के वसुलीच होत नसल्याने मोठ्या प्रमाणात उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com