
हरसूल | Harsul
राज्यात करोनाच्या महामारीत आरोग्यदूत वैद्यकीय क्षेत्रासह रुग्णवाहिका अनन्य महत्वकांक्षी ठरत आहे.
अनेक रुग्णांना संकटसमयी हातभार लावून पुनर्जीवित जन्म देणाऱ्या रुग्णवाहिकेला सर्वच स्तरावरून करोना काळात सलाम करण्यात येत आहे. मात्र हरसूल ग्रामीण रुग्णालयाच्या १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका दुरावस्थेत असून रुग्णवाहिकेच्या दुरवस्थेबरोबरच वाहनक्रमांक ही दुरवस्थेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून कुपोषित बालक, स्तनदा, गरोदर, प्रसूती महिला तसेच अपघाताच्या वेळी अनेकांची जीवनदायिनी ठरलेल्या रुग्णवाहिका वरदान ठरत आहेत. जीवन वाहिनी म्हणून सध्या लोकांची सेवा करीत आहे.
या ग्रामीण रुग्णालयाशी नाळ जोडलेला मोठाव्याप्त परिसर आहे. त्यामुळे या दोनच रुग्णवाहिका उपलब्ध असतात. परंतु सध्या यातील एका रुग्णवाहिकेची दुरावस्था झाली आहे. येथील नागरिकांनी दुरुस्तीची अन्य एका रुग्णवाहिकेची मागणी केली आहे.
हरसूल ग्रामीण रुग्णालय हे जवळपासच्या अनेक गावांना वरदान ठरत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेची तात्काळ दुरुस्ती करून रुग्णांना सेवा पुरवावी.
- अनिल बोरसे, ग्रामस्थ