देवळाली कॅम्प । Deolali Camp

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आगामी महाराष्ट्र केसरी निवडीस्पर्धेच्या निवड चाचणीतून गत वर्षीचा हर्षवर्धन सदगीर पुन्हा आखाड्यात उतरल्याने राज्यातील पहिलवान सतर्क झाले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांचे आदेशानुसार नाशिक जिल्ह्यला तालीम संघाच्या वतीने जिल्हा निवड चाचणी स्पर्धा काल भगूर येथील स्वा स न. ल .बलकवडे क्रीडा संकुल येथे सुरू झाल्या. या चाचणी साठी जिल्हाभरातून विवध तालुक्यातील १५० पहिलवान सहभागी झाले आहेत.

विविध वजनी गटाच्या या निवड चाचणी स्पर्धेचा शुभारंभ ऍड वसंत नगरकर,ऍड गोरखनाथ बलकवडे, दिनकर पाटील, प्रेरणा बलकवडे, प्रा.रविंद्र मोरे, बाळू नवले, प्रा. दीपक जुंद्रे, ऍड विशाल बलकवडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

या निवड चाचणीसाठी ५७,६१,६५,७०,७९,८६,९७ व केसरी( खुला) अशा विविध वजनगटातील पहिलवान सहभागी झाले, यावेळी पंच म्हणून चेतक बलकवडे, संजय गायकवाड, रामप्रवेश यादव, रोहित आहिरे, राहुल कापसे आदींनी यांनी काम बघितले.

स्पर्धेत गादी व माती विभाग अशा दोन विभागात पैलवानांची निवड करण्यात आली यामध्ये गादी विभागात ५७ किलो वजनी गटात - पवन ढोन्नर, (नाशिक,) ६१ किलो - मनोज घिवंदे ,(दिंडोरी)६५ किलो- भाऊराव सदगीर,(सिन्नर), ७० किलो सुरज गबाले,(नाशिक),७९ किलो बाळू बोडके,(नाशिक )

८६ किलो-मनोज कातोरे,(नाशिक), ९२ किलो- गणेश मोरे,(नाशिक,) ९७ किलो- प्रकाश बिडगर,(चांदवड )

खुलाकेसरी गट- हर्षवर्धन सदगीर,(नाशिक)

तर माती विभागातील ५७ किलो वजनी गटात - गणेश कडनोर,( मालेगाव), ६१ किलो - सोमनाथ ढोन्नर,(नाशिक), ६५ किलो- दिनेश बिन्नर,(इगतपुरी,)७० किलो- बाळू जुंद्रे,(इगतपुरी), ७४ किलो- अनिल ढोकणे,(इगतपुरी,) ७९ किलो- संग्राम गिडगे, (मनमाड,) ८६ किलो- ज्ञानेश्वर खेमनार, (नांदगाव,) ९२ किलो- गणेश बेनके,(भगूर,) ९७ किलो- मोहम्मद सैफ तारीक हुसेन,(मालेगाव) तर खुल्या केसरीगटातून - राहुल चौगुले,(सिन्नर )यांची निवड करण्यात आली.

गत वर्षी राज्याच्या इतिहासात पाहिल्याद हर्षवर्धन सदगीर ने नाशिक ला महाराष्ट्र केसरी चा बहुमान मिळवून दिला होता, या वर्षी देखील तो पूर्ण ताकतीने डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी आखाड्यात उतरला आहे.

या पूर्वी जळगावच्या विजय चोधारी यांनी लागोपाठ तीन वेळा महाराष्ट्र केसरी हा पटकाविला आहे. नाशिक चा सदगीर त्या दृष्टीने पावले टाकताना दिसत असल्याने राज्यातील मल्ल मात्र सतर्क झाले आहेत