सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)

विश्वसम्राट बळीराजा गौरव दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून येथील हर्षाली शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्र यांच्यातर्फे बळीराजा गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यात चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, धुळे, नाशिक, मुंबई आणि पुणे येथील जवळपास साडेचारशे स्पर्धकांनी भाग घेतला.

त्यात बळीराजाच्या आर्त हाकेचा संदेश देणारी रांगोळी हर्षाली शिंदे (सिन्नर) हिने उत्तम पद्धतीने रेखाटली. तिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ऑनलाईन घोषित करण्यात आले.

यावेळी आयोजक प्रा. प्रतिमा परदेशी यांनी फोनवरून हर्षालीचे अभिनंदन करून पारितोषिकाची रक्कम ऑनलाईन हस्तांतरित केली.