बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख पदी हरिभाऊ भोये यांची नियुक्ती

बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख पदी हरिभाऊ भोये यांची नियुक्ती

सुरगाणा | प्रतिनिधी

सुरगाणा तालुका ( Surgana Taluka ) बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebanchi Shivsena )तालुका प्रमुख पदी सराड येथील हरिभाऊ भोये ( Haribhau Bhoye ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भोये यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde )यांच्या आदेशानुसार कार्यक्षेत्र सुरगाणा तालुका विधानसभा क्षेत्रात करण्यात आली असून एक वर्षे कालावधी करीता आनंद आश्रम टेंभी नाका अग्यारी लेन ठाणे(प) येथून नियुक्ती देण्यात आली असल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

पक्ष संघटना मजबूत करणे, आदिवासी भागातील समस्या शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी तसेच वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तालुका प्रमुख भोये यांनी सांगितले.

त्यांच्या निवडीबद्दल खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, जिल्हा अध्यक्ष भाऊलाल तांबडे,मंजुळा गावित, जिल्हा प्रमुख अनिलजी ढिकले, संपर्क प्रमुख जयंत साठे,संजय बच्छाव, तुळशीराम पिठे, शास्त्री गावित, चिंतामण गायकवाड, प्रकाश पवार, सोमनाथ गांगुर्डे, भवर मोंढे, धनराज डंबाळे, भास्कर चौधरी, प्रकाश वळवी आदींनी स्वागत केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com