हरणबारी धरणातून पाण्याचा विसर्ग

हरणबारी धरणातून पाण्याचा विसर्ग

हरणबारी । वार्ताहर। Haranbari

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मोसम खोर्‍यास वरदान ठरलेल्या (Rain) बागलाण तालुक्यातील (Baglan taluka) हरणबारी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे...

हरणबारी धरण (Haranbari Dam) तुडुंब भरल्याने सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सांडव्यावरून पाणी मोसम नदी (Mausam River) पात्रात वाहू लागले आहे. गत अनेक वर्षात प्रथमच हरणबारी धरण जुलै महिन्यात तुडुंब भरण्याचा नवा उच्चांक नोंदवला गेला आहे.

दरम्यान, या धरणातून सध्या ३ हजार ९२६ ने पाणी नदीपात्रात वाहत असल्याने मोसम नदीला मोठा पूर (Flood) आला आहे. तसेच या नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने मोसम नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com