झोडगे, वडनेरसह उमराण्यातील शिवालयांमध्ये ‘हर हर महादेव’

महादेव घाटावर शिवरात्रोत्सव
झोडगे, वडनेरसह उमराण्यातील शिवालयांमध्ये ‘हर हर महादेव’

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

करोना (corona) निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर महाशिवरात्रोत्सव (Mahashivaratrotsav) साजरा होत असल्याने शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोसमकाठावरील महादेव घाटावर (mahadev ghat) महाशिवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

त्यानिमित्त संपुर्ण परिसर भगवे झेंडे व पताके लावून सुशोभित करण्यात आला असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई (Electric lighting) करण्यात आली आहे. श्री महादेव सेवा समितीतर्फे (Shri Mahadev Seva Samiti) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन (Organizing religious programs) करण्यात आले आहे.

शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याशेजारी (Bhuikot forts) 1730 साली श्रीमंत सरदार नारोशंकर राजेबहाद्दर (Sardar Naroshankar Rajebahaddar) यांनी बांधलेल्या महादेव घाट मंदिरात यंदा शिवरात्रोत्सव (mahashivratri) मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जाणार आहे. पहाटे 5 वाजेपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असून दिवसभर प्रसाद वाटप सुरू राहणार आहे. सकाळी 6 व सायंकाळी 7 वाजता आरती करण्यात येणार आहे. याशिवाय पहाटे 4 ते 6, दुपारी 1 ते 3 व रात्री 9 ते 10.30 दरम्यान यजमानांच्या हस्ते अभिषेक केला जाईल.

दुपारी 4 ते 5.30 दरम्यान नारायणी महिला भजनी मंडळाचा (bhajni mandal) व 5 ते 6.30 दरम्यान भावसार महिला भजनी मंडळाचा भजनांचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 7.30 ते 8 दरम्यान सामुदायिक शिवस्तुती पठन केले जाईल तर रात्री 10 ते 12 दरम्यान राजस्थानी मंडळाचा कार्यक्रम होईल. मध्यरात्री ठिक 12 वाजता शिवरात्रीनिमित्त विशेष आरती करण्यात येईल.

दि. 2 मार्चरोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन (Organizing Mahaprasada) करण्यात आले आहे. शिवरात्रीनिमित्त भाविकांनी शक्यतो 12 ते 4 या कमी गर्दीच्या वेळेत दर्शन घ्यावे. सायंकाळी 7 वाजेनंतर गर्दीचा अंदाज घेत गाभार्‍याबाहेरून मुख दर्शन सुरू ठेवले जाईल याची भाविकांनी नोंद घेत महाशिवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री महादेव सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

झोडगे येथे यात्रोत्सव

झोडगे (zhagde) येथील पुरातन हेमांडपंथी माणकेश्वर महादेव मंदिर (Hemandpanthi Mankeshwar Mahadev Temple) माळमाथा परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असून येथे दरवर्षी शिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव साजरा होतो.

मात्र गत दोन वर्षांपासून करोनाच्या (corona) निर्बंधांमुळे यात्रोत्सवास बंदी असल्याने भाविकांसह व्यावसायिकांचाही मोठा हिरमोड झाला होता. यावर्षी करोनाचे संकट कमी झाल्याने यात्रोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मंदिर परिसरात साफसफाई (Cleaning) व विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांसह खवैय्ये व तमाशा रसिकांमध्येही उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

यात्रेनिमित्त मंदिर परिसरात तमाशा कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम होतो. धुळे, जळगावसह नाशिक जिल्ह्यातील कुस्तीगीर येथील कुस्तीच्या आखाड्यात आपले कसब दाखवितात. खेळणे-पाळण्यांसह खाद्यपदार्थांच्या दुकानांचीही रेलचेल असते. त्यामुळे माहेरवाशिणींसह नातेवाईक व मित्र परिवार गावात हजेरी लावून यात्रोत्सवाचा लाभ घेतात. दोन वर्षानंतर झोडगे येथील महादेव मंदिरात यंदा यात्रोत्सव साजरा होत असून सरपंच पंडित देसले व सदस्य यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गत आठ दिवसांपासून परिश्रम घेत आहेत.

वडनेर येथे हरिनाम सप्ताह

वडनेर येथील वर्णेश्वर सिध्देश्वर हरिहर महादेव मंदिरात शिवरात्रोत्सवानिमित्त दि. 23 फेब्रुवारीपासून ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून उद्या (दि. 1) शिवरात्रीनिमित्त एक दिवशीय यात्रोत्सव साजरा होणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे देण्यात आली आहे. नवसाला पावणारा महादेव, अशी काटवन भागातील भाविकांची श्रध्दा असलेल्या या प्राचीन मंदिरात दोन स्वयंभू शिवलिंग आहेत. अनेक वर्षापासून महाशिवरात्र काळात येथे ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते.

यावर्षीही महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न होत असून सावतावाडी, वडनेर-खाकुर्डी, रामनगर, कोठरे, अजंग-वडेलसह काटवन परिसरातील भाविक कीर्तनाला हजेरी लावत आहेत. उद्या महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव साजरा होणार असून मंदिरात अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. तसेच दि. 2 मार्चरोजी पारायण सप्ताहाची सांगता होईल. यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सरपंच दीपक मोहिते, मंदिराचे सेवेकरी हेमंत कापडणीस, सदाशिव चौधरी, रघुनाथ वाघ, बाळकृष्ण अमृतकर, उमेश भावसार, सुरेश सोनवणे आदी परिश्रम घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com