
दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) जानोरी येथे येथे ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान अंतर्गत जिल्हा परिषद (zilha parishad) प्राथमिक शाळा (Primary school), महात्मा फुले विद्यालय, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने रॅलीचे (rally) आयोजन करण्यात आले होते.
प्रथमता जि. प. प्राथमिक शाळेच्या प्रांगणातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. ‘भारत माता की जय, वंदे मातरम, विजयी विश्व तिरंगा प्यारा म्हणत हातामध्ये राष्ट्रध्वज (national flag) घेऊन आवेश पूर्ण घोषणा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी (students) वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या. यावेळी महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थीनीने केलेली भारत मातेची वेशभुषा ही लक्षवेधी ठरली होती.
त्यामुळे या विद्यार्थ्यांनी (students) सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर महात्मा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात (gujrat) तसेच हातात राष्ट्रध्वज घेऊन रॅली काढली होती. संपूर्ण गावात ही रॅली काढून शिक्षकांनी (teachers) राष्ट्रध्वजाचे महत्व पटवून दिले. त्यानंतर या रॅलीची सांगता ग्रामपंचायत प्रांगणात आली. त्यानंतर देशाचे संरक्षण विभागातील डीआरडीओचे (DRDO) अधिकार्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली.
यावेळी मुख्याध्यापक नाना गंगावणे यांनी त्यांचे स्वागत केले. ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) प्रत्येक नागरिकांनी प्रभावीपणे राबवून देशाविषयी सन्मान व्यक्त करण्याचे आवाहन संयुक्त संचालक आर.एस. पाटील यांनी केले. यावेळी वैज्ञानिक लुब्ना खान, आशुतोष शर्मा, पवनकुमार सोनी, समाधान ्खैरणार, चंद्रशेखर थोरात, गौरी काठे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.