‘हर घर तिरंगा’ उपक्रम: विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

‘हर घर तिरंगा’ उपक्रम:  विद्यार्थ्यांची प्रभातफेरी

दिंडोरी । प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयातील ( Mahatma Phule Vidyalaya, Janori )विद्यार्थ्यांची ‘हर घर तिरंगा’ ( Har Ghar Tiranga Campaign )अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली.याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिरंगा जनजागृती विषयी विविध घोषवाक्य दिले.

त्यात ‘ घरोघरी तिरंगा फडकवू स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू, हर घर तिरंगा लढा महान, माझा तिरंगा माझी शान. तिरंगे को सलामी हमारी शान है ,हर घर तिरंगा हमारी पहचान है ’ आदी घोषणा देण्यात आल्या. तिरंगा ध्वजा फडकवण्या संदर्भातील नियमांविषयीची माहिती गावातील नागरिकांना व्हावी, यासाठी सदर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. आर. निकम, पर्यवेक्षक व्ही. एस. बागुल, उपशिक्षक आश्रोबा सिरसाट, लक्ष्मण मौले, एस. एस. खैरनार, अमोल काशीद, छोटू चौरे, अशोक गावित, जयसिंग कोकणी, रूपाली चौधरी, रूपाली जगताप, अमृता धोंडगे आदींसह शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com