ऊस उत्पादकांना रासाकाकडून खुश खबर !

ऊस उत्पादकांना रासाकाकडून खुश खबर !

पालखेड मिरचीचे । वार्ताहर | Palkhed Mirchiche

नफा (profit) मिळविण्यासाठी नव्हे तर ऊस उत्पादकांच्या (Sugarcane growers) भावना, दु:ख जाणुन घेऊन बंद असलेल्या चुली पुन्हा पेटाव्या या उद्देशाने

आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था (Late. Ashokarao Bankar Urban Co-operative Credit Society) पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना (Karmaveer Kakasaheb Vagh Cooperative Sugar Factory) भाडेतत्वावर चालविण्यास घेऊन

ऊस उत्पादक, कामगार वर्ग, ऊसतोडणी कामगार व रासाका (RASAKA) कार्यक्षेत्रावरील छोटे-मोठे व्यवसायधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यंदा कारखान्याचा 40 वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न होऊन काही दिवसच झाले असतांना देखील कारखाना प्रशासनाच्या (Factory Administration) वतीने यंदाच्या सन 2022/23 या वर्षासाठी शेतकर्‍यांना (farmers) प्रतिटन 2500 रुपये दर निश्चित करण्यात आला असून

लवकरच संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात एकरकमी जमा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे विद्यमान चेअरमन रामभाऊ माळोदे, व्हा.चेअरमन अरविंद जाधव यांचेसह सर्व संचालक मंडळाने दिली. कारखान्याचा वतीने नव्याने उभारण्यात आलेला डिस्लरी प्लँट सुरू होणार असून परिसरातील तसेच कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना रानवड साखर कारखान्यास ऊस पुरवावा असे आवाहन आमदार दिलीप बनकर यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com