हनुमान जन्मस्थान अंजनेरीच; पोलिसांना निवेदन

साधू ग्रामस्थ एकवटले
हनुमान जन्मस्थान अंजनेरीच; पोलिसांना निवेदन

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar

तालुक्यातील अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ (Anjaneri is the birthplace of Hanuman) असून त्याबाबत पुराणांमध्ये आहे.असे अंजनेरी येथील बैठकी प्रसंगी महंत व ग्रामस्थां यांचे कडून सांगण्यात आले.

कर्नाटक ( karnataka ) मधील किष्किंधा नगरी हनुमानाचे जन्मस्थळ असून त्याचा प्रचार-प्रसार व्हावा याकरिता स्वामी गोविंदानंद सरस्वती (Swami Govindananda Saraswati) यांनी चित्ररथ द्वारे प्रचार-प्रसार चालू आहे सदर चित्ररथ त्र्यंबकेश्वर तीन दिवसापासून येथे दाखल झाला असून यामुळे जन्मस्थळा वरून वाद निर्माण झाला.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून ओळखले जाते. परंतु स्वामी गोविंदानंद सरस्वती (Swami Govindananda Saraswati) यांनी किश्किंदानगरी हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा करून रामायणातील दाखले दिलेले आहे याबाबत अंजनेरी येथील महंत ब्रह्मगिरी महाराज (Mahant Brahmagiri Maharaj) उर्फ अशोकबाबा, श्रीराम शक्ती पिठाचे महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती ,महंत पिनकेश्वर, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक झाली .

यावेळी अंजनेरी हनुमानाचे जन्मस्थळ असून याबाबत अनेक पुराणांमध्ये दाखले देण्यात आले. यावेळी अंजनेरी पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.दरम्यान या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले आहे.

अंजनेरी बाबत स्वामी गोविंदानंद सरस्वती कडून भाविकांची दिशाभूल केली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.वरील प्रकार थांबवा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अटल आखाड्याचे महंत उदगिरी महाराज, ब्रह्मगिरी महाराज,सिद्धेश्वरानंद महाराज, यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कमळू कडाळी संजय चव्हाण गणेश चव्हाण राजेंद्र बदादे वेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com