अंजनेरी गडावर आज हनुमान यात्रा; बेझे येथे शिलाई चैत्रोत्सव

अंजनेरी गडावर आज हनुमान यात्रा; बेझे येथे शिलाई चैत्रोत्सव

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

हनुमान जन्मस्थान म्हणून प्रचलित असलेल्या अंंजनेरी गडावर (Anjaneri fort) आज (दि.16) हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरणार आहे. तर बेझे (Beze) गावात येथीही चैत्रपौर्णिमानिमित्त शिलाई देवीचा यात्रोत्सव होणार आहे. येथे सुमारे 50 हजार भाविकांची हजेरी लागण्याची शक्यता आहे.....

दोन वर्षानंतर यात्रा होत असल्याने अंजनेरी गडावर पहाटेपासून जन्मोत्सव सोहळा सुरू होईल. तसेच दिवसभर भाविकांची गर्दी सुरू राहणार आहे. पौर्णिमा असल्याने आधल्या दिवशी चंद्र प्रकाशात भाविक गड चढण्यास सुरुवात करतात मुक्कामी जाऊन जंयंती उत्सवात सामील होतात.

गडावर जाण्यासाठी रस्ता असून मुख्य गडावर पायी जावे लागते. डोंगरावर ग्रामपंचायत हद्दीत पर्यंत रस्ता आहे. पुढील रस्ता वन विभागाच्या (Forest Department) अखत्यारीत आहे. डांबरीकरण झालेले नाही.

खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी अंंजनेरी गाव दत्तक घेतले होते. मात्र प्रत्यक्षात तेथे काही विकासाचा लवलेश नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डोंगरावरील शिखरावर अंजनी मातेचे दगडी प्राचीन मंदिर आहे.

या मंदिराचा जीर्णोद्धार करावा करावा अशी मागणी होत आहे. बेझे येथे शिलाई देवी यात्रा उत्सवात महापूजा, पालखी, मिरवणूक, हळदी कुंकू आदी कार्यक्रम होणार आहे. दिवसभर यज्ञ याग सुरू असेल.

देवी मंडळ ट्रस्टला ग्रामपंचायत,ग्रामस्थ यात्रेसाठी सहकार्य करणार आहेत. सोमवंशीय क्षत्रिय पाठारे पाचकळशी ज्ञातीबांधवांची ही कुलस्वामिनी आहे. मुंंबई परिसरात वास्तव असलेल्या भट्टे, नावलकर, पाठारे, मार्केटकर, दाते, पत्केश्वर कुटुंबाची ही कुलस्वामिनी आहे.

त्यामुळे मुंबईहून (Mumbai) भाविक यात्रेस येतात. अंजनेरी येथे जय बाबाजी परिवाराकडून हनुमान जयंंती सप्ताह पारायण सुरु आहे. दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी एसटी महामंंडळाने (MSRTC) जादा बसेस सोडव्यात अशी मागणी होत आहे. उन्हाळा लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी पाण्याचे टँकर ग्रामपंचायतीने उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.