हाथरस घटनेतील गुन्हेगारांना फाशी द्या

हाथरस घटनेतील गुन्हेगारांना फाशी द्या

शिवसेना आक्रमक : जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नाशिक । Nashik

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय युवतीवर झालेल्या अत्याचाराचा आणि तिच्या कुटुंबावरील अन्यायाचा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

हा अत्यंत घृणास्पद प्रकार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्यात यावी, अशी मागणी कक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. सर्वांना शरमेने मान खाली घालायला लावलेला असा हा वाईट प्रकार असून, १९ वर्षाच्या मुलीला जिवंतपणी दिलेल्या यातना आणि आणि केलेली ठळक हे माणुसकीला काळिम फासणारे आहे.

शिवाय तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या हाती सुपूर्द न करता त्यांनाही अंधारात ठेवून पोलिसांनी परस्पर तिचा अंत्यविधी उरकून कुटुंबियांवर केलेला हा अन्याय देखील असह्य आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप यावेळी निवेदांकर्त्यांनी केला. तिच्या कुटुंबाला प्रसारमाध्यमांशी देखील भेटू दिले जात नाही.

गावाला पोलीस छावणीचे स्वरूप देऊन तिच्या परिवाराला बंदिस्त करत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. समाज कंटकांकडून तर अन्याय झालाच पण, सरकारी यंत्रणांनी ही कुठलीही मदत न करता गुन्हेगारांना एक प्रकारे पाठबळ दिल्याचं बोलले जाते.

त्यामुळे अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांसोबतच यंत्रणेतील पोलीस आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवत पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांच्याकडे केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com