नाशिक । Nashik

नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहर या उपक्रमात सहभागी झाले आहे. स्ट्राव्हा या अॅपच्या सहाय्याने सदर राईडचे सर्वेक्षण करण्यात आले.

शहरात त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी हा मार्ग पॉप अप सायकल ट्रॅक म्हणजेच तात्पुरत्या स्वरुपाचा सायकल मार्ग करण्यात येणार आहे, त्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. या मार्गावर सायकल चालविण्यासाठी या मार्गावर सायकल चालविण्यासाठी येणार्या अडचणी समजून घेण्यासाठी हे हँडल बार सर्वेक्षण घेण्यात आले. स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या संयुक्तविद्यमाने इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहर या उपक्रमात सहभागी झाले आहे. स्ट्राव्हा या अॅपच्या सहाय्याने सदर राईडचे सर्वेक्षण करण्यात आले. अशोक स्तंभ ते पपाया नर्सरी व पपया नर्सरी ते अशोक स्तंभ या तब्बल 16 किमीच्या राईडमध्ये राईडर्सना पुढील अनुभव आला. यात स्मार्ट रोडवर डेडीकेटेड सायकल ट्रॅक असल्याने, अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका सायकल चालवण्यास अडथळा नाही. त्र्यंबक नाक्यावर सिग्नलवरून वळण घेणे अवघड आहे. त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी दरम्यान रहदारी आणि भरधाव गाड्यांमुळे सायकल चालवण्यास अडचण येते.

अनेक ठिकाणी गाड्या विरुद्ध दिशेने येतात. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी गाड्या पार्कींग केलेल्या असल्याने सायकल चालवण्यास त्रास होतो. मायको सर्कल येथे सायकलसह रस्ता ओलांडणे फारच अवघड आहे. येथे रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने सायकल वरून उतरूनच रस्ता ओलांडावा लागतो. रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसामुळे खड्डे झाल्याने सायकल चालवण्यास त्रास होतो. त्र्यंबक नाका ते पपाया नर्सरी या दरम्यान प्रस्तावित पॉप अप सायकल ट्रॅक बनविताना वरील मुद्द्यांच्या आधारे सुधारणा किँवा बदल करण्यास मदत होणार आहे.

या सर्वेक्षणासाठी अशोक स्तंभ येथून सुरूवात होऊन स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकमधून पुढे जात त्र्यंबक नाक्याच्या सिग्नलवरून पपाया नर्सरी पर्यंत राईड घेण्यात आली. पपाया नर्सरीपासून पुन्हा त्र्यंबक नाका मार्गे स्मार्ट रोड ते अशोक स्तंभ अशा प्रकारे राईडचा समारोप झाला. या सर्वेक्षणासाठी नाशिक स्मार्ट सिटीतील अधिकारी व कर्मचारी, तसेच नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशनचे सदस्य व नागरिक सहभागी झाले होते.