दिव्यांग दिलीपने अमेरिकेत फडकविला तिरंगा

दिव्यांग दिलीपने अमेरिकेत फडकविला तिरंगा

खोकरविहीर । वार्ताहर | Khokarvihir

सुरगाणा तालुक्यातील (surgana taluka) तोरणडोंगरी येथील रहिवाशी व आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ (Adarsh ​​Samata Shikshan Prasarak Mandal), अलंगुन या शिक्षण संस्थेच्या शहीद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी दिलीप गावित (Dilip Gavit) या दिव्यांग (handicaped) खेळाडूंने

अमेरिकेत (america) नुकत्याच पार पडलेल्या युएसडेझर्ट चॅलेंज गेम्स 2022 (US Dessert Challenge Games 2022) यामध्ये 100 आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदकाची (Silver medal) कमाई केली. पराकोटीची जिद्द उराशी बाळगून अपंगत्वावर मात करत या खेळाडूने नेत्रदिपक यश संपादन केले आहे.

दिलीप हा गरीब आदिवासी कुटूंबातील मुलगा. आई मोहना आणि वडील महादू गावीत हे दाम्पत्य फॉरेस्ट प्लॉटवर शेती करुन कुटूंब चालवतात. अशा कठीण परिस्थिती मुलगा शिकला पाहिजे, यासाठी तळमळ असलेल्या आईवडीलांनी दिलीपला एका हाताने अपंग असला तरी याला शिक्षण (education) हेच शस्त्र तारु शकते, ही बाबत ओळखली आणि शिक्षणासाठी मागेपुढे न पाहता मोलमजूरी करुन त्याला शिकवले. स्व:ताची शारीरिक क्षमता, स्वत:तील खेळाची आवड ओळखून त्याने खेळाकडे लक्ष वळविले. अलंगुणच्या क्रिडा मैदानावर सराव सुरु केला.

येथील माध्यमिक शाळेत आर. डी. चौधरी, मनोहर चव्हाण यांनी त्याच्या धावण्याच्या कौशल्याची चुणूक ओळखून त्याला घडवले. विविध स्पर्धांत उतरुन खेळाचे सातत्य कायम राखले. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील यश संपादन करतानाच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या यशाबद्दल जिल्ह्यातून कौतुक होत आहे.

पुढील शिक्षणासाठी बाहेर पडल्यानंतरही त्याने आपल्या खेळावरील एकाग्रता आणि जिद्द टिकावून ठेवली. सतत कठोर परिश्रम घेतले. एका खेडे गावातील मुलगा आपल्या अपंगत्वावर मात करीत अमेरिकेसारख्या देशात रौप्य पदक मिळवू शकला, ही अभिमानाची आणि कौतुकाचीच बाब आहे.

- जे. पी. गावीत, शिक्षण संस्थाचालक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com