नळ कनेक्शन
नळ कनेक्शन
नाशिक

चाळीस नळ कनेक्शनवर पाणी पुरवठा विभागाचा हातोडा

पाथर्डी परीसरात मनपाची मोहीम

Gokul Pawar

Gokul Pawar

नवीन नाशिक | New Nashik

मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार विनापरवाना अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याचे काम चालू असून पाथर्डी गाव व पाथर्डी शिवार येथे मोहीम चालू केली असता प्रचंड प्रमाणात अनधिकृत नळ कनेक्शन सापडले आहेत.

तरी ज्या परवानाधारक प्लंबर यांनी बोगस नळ कनेक्शन केलेले आहे. असे आढळून आल्याने त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच ज्या नागरिकांनी विनापरवाना नळ कनेक्शन घेतलेले आहे. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

सदर मोहीम तीन दिवसापासून चालू आहे. यामध्ये आतापर्यंत ४० अनधिकृत नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. यापुढे सुद्धा नवीन नाशिक विभागात ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती नवीन नाशिक पाणी पुरवठा अभियंता गोकुळ पगारे यांनी दिली.

ही मोहीम विभागीय अधिकारी संदेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता ज्ञानेश्वर गायकवाड, सुभाष शेजवळ, दत्तू गावंडे, राहुल दोंदे आदीं राबवित आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com