दिंडोरी तालुक्यातील निम्मी जनता 'सिंगल फेंज'च्या प्रतिक्षेत

दिंडोरी तालुक्यातील निम्मी जनता 'सिंगल फेंज'च्या प्रतिक्षेत

ओझे | वार्ताहर Ozhe - Dindori

दिंडोरी तालुक्यातील (dindori) प्रत्येक खेडेगावामध्ये महावितरण कंपनी (MSEDCL) कडून सिंगल फेंज योजना (Single fence plan) कार्यान्वित करण्यात आली असून दुसरीकडे मात्र शिवारात (मळयात) राहणा-या जनतेला मात्र रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागत आहे.

जेव्हा पासून महाराष्ट्रात (maharashtra) लोडशेडिंग (Load shedding) अस्तित्वात आली तेव्हा पासून तर आजपर्यत महावितरण कंपनीने मळ्याच्या वस्त्यावर राहणा-या जनतेसाठी कोणतेही टोस पाऊल उचललेले नाही. यामुळे वाड्या वस्त्यावर मळ्यामध्ये राहणा-या जनते मध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे. सिंगल फेज योजनेसाठी ज्या ठिकाणी वीजउपकेंद्र (Substation) आहे त्यांच ठिकाणी प्रत्येक परिसरासाठी गावासाठी गावठाण फिडर व मळ्यासाठी कृषी फिडर (Agricultural feeders) आशी विभागणी करून

कृषी फिडरवर सिंगल फेंजचा ट्रासफार्मर (Transformer) बसवून रात्रीच्या वेळेत थ्री फेज वीज पुरवठा (Power supply) खंडीत झाल्यानंतर सिंगल फेज वीजपुरवठा चालू होतो तालुक्यात काही बोटावर मोजण्या इतक्या ठिकाणी सिंगल फेंज योजना कार्यान्वित करण्यात आली असून सुरळीत पणे चालू आहे यामुळे तालुक्यातील मळ्याच्या वस्तीवर राहणारी काही जनता प्रकाशात तर काही जनता अंधारात आशे काहीसे चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यात ज्या वीज उपकेंद्रामध्ये सिंगल फेंज योजना चालू झाललेली नाही किंवा फिडरची गावठाण फिडर व कृषी फिडर आशी विभागणी केलेली आशा ठिकाणी मळ्यामध्ये राहणारे लोक ट्रासफार्मरच्या चायनल वर डिओ टाकून ट्रासफार्मर मध्ये वीज तयार करून मळ्यासाठी वीज पुरवठा केला जातो यांमुळे घरात अंधक होईना लाईट लागतो मात्र हा विज पुरवठा अधिकृत नसून यांमुळे अपघात होण्याची जास्त शक्यता असते तसे अपघातही झालेले आहे

मात्र यांची महावितरण कंपनीकडे नोंद नाही महावितरण कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला मक्याच्या वस्तीवर राहणा-यां जनतेचे काय वीजचे संदर्भात काय हाल चालू आहे यांची सपूर्णपणे कल्पना आहे मात्र या प्रश्नकडे महावितरण कंपनी का डोळेझाक करित आहे हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. महाराष्ट्रा मध्ये संपूर्ण विदर्भ व मराठवाड्याच्या (marathwada) काही भागातील जनता गावात राहत असल्यामुळे

शेतकरी शिवारात वस्ती करून राहत नाही मात्र संपूर्ण नासिक जिल्हा (nashik district) व नगराच्या भागातील शेतकरी (farmers) मळ्यात राहतात त्यामुळे या मळ्यात राहणा-यां जनतेसाठी सिंगल फेंज योजना अंत्यत महत्वाची आहे यासाठी लोकप्रतिनिधीनी शासन दरबारी हा मुद्दा उचलून धरला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर मळ्या मध्ये राहणा-यां जनतेला निश्चित न्याय मिळेल आशी चर्चा सर्वत्र होत आहे.

दिंडोरी तालुक्यात सध्या सर्वत्र बिबट्याचा (leopard) धुमाकूळ असल्यामुळे मळ्यात राहणा-या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्याप्रमाणे ट्रासफार्मरच्या चायनलवर डिओ टाकून वीज पुरवठा म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे असल्यामुळे महावितरण कंपनाने यांची दखल घेवून मळ्याच्या वस्तीवर राहणा-या लोकांसाठी तालुक्यात ज्या उपकेंद्रामध्ये सिंगल फेंजचे ट्रासफार्मर बसविले नाही त्या ठिकाणी हे ट्रासफार्मर बसविण्यात यावे अशी मागणी वस्त्यांवर राहणार्‍या जनतेकडून होत आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून शिवारात मळ्यात राहणा-यां लोकांना अंधाराचा सामना करावा लगत असून आम्हाला महावितरण कंपनी कडून न्याय कधी मिळणार आहे. यासाठी महावितरण कंपनीने आमची विजेची त्वरित सोय करावी त्या प्रमाणे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी या विज प्रश्नी लक्ष दयावे.

- विलास जाधव, शेतकरी करंजवण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com